व्हॅलेंटाईन डेलाच 'लव्ह अँड डेथ'चा थरार! प्रेयसीला गोळी घालून स्वतःला संपवणाऱ्या प्रियकराच्या 'सुसाइड नोट' मध्ये काय? मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 22:59 IST2026-02-14T22:58:51+5:302026-02-14T22:59:21+5:30

सुरुवातीला ही आत्महत्या असावी, असे वाटत होते. मात्र, प्राथमिक तपासानंतर प्रियकराने आधी प्रेयसीची गोळी झाडून हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवल्याचे स्पष्ट झाले.

noida The thrill of Love and Death on Valentine Day What's in the suicide note of a lover who shot his girlfriend and killed himself Big revelation | व्हॅलेंटाईन डेलाच 'लव्ह अँड डेथ'चा थरार! प्रेयसीला गोळी घालून स्वतःला संपवणाऱ्या प्रियकराच्या 'सुसाइड नोट' मध्ये काय? मोठा खुलासा

व्हॅलेंटाईन डेलाच 'लव्ह अँड डेथ'चा थरार! प्रेयसीला गोळी घालून स्वतःला संपवणाऱ्या प्रियकराच्या 'सुसाइड नोट' मध्ये काय? मोठा खुलासा

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नोएडातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील सेक्टर ३९ परिसरात एका कारमध्ये प्रेमी युगलाचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडले. सुरुवातीला ही आत्महत्या असावी, असे वाटत होते. मात्र, प्राथमिक तपासानंतर प्रियकराने आधी प्रेयसीची गोळी झाडून हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवल्याचे स्पष्ट झाले.

स्थानिकांनी यासंदर्भात माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांची कारची काच तोडून मृतदेह बाहेर काढले. मृतांची ओळख पटली असून तरुणाचे नाव सुमित (त्रिलोकपुरी) आणि तरुणीचे नाव रेखा देवी (सलारपूर) असे आहे. रेखा बेपत्ता झाल्याची तक्रार एक दिवस आदीच सेक्टर ५८ पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. कारमधून दोन रिकाम्या पुंगळ्या आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याशिवाय, सुमितचा मृतदेह ड्रायव्हर सीटवर होता आणि पिस्तूल त्याच्या हातात होते.

नोटमध्ये काय? -
पोलिसांना सुमितने व्हॉट्सॲपवर लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली आहे. या नोटमधून घटनेचे कारण समोर आले आहे. सुमितने लिहिले आहे, "मी, सुमित, स्वतःला संपवत आहे. यासाठी रेखा जबाबदार आहे. कारण गेल्या १५ वर्षांपासून आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि तिने मला लग्नाचे वचन दिले होते. आता ती दुसऱ्या कुणाशी तरी लग्न करत आहे. रेखाने माझा विश्वासघात केला. म्हणून मी आत्महत्या करत आहे."

पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना घटनेची माहिती दिली असून न्यायवैद्यक पथकाने (Forensic Team) घटनास्थली जाऊन पाहणी केली. तसेच, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
 

Web Title : वेलेंटाइन डे पर खौफ: प्रेमी ने प्रेमिका को मारकर की आत्महत्या; सुसाइड नोट में कारण

Web Summary : नोएडा: वैलेंटाइन डे पर एक कार में युगल मृत पाए गए। प्रेमी ने प्रेमिका को मारकर आत्महत्या की, सुसाइड नोट में 15 साल के रिश्ते के बाद शादी का वादा टूटने पर विश्वासघात का हवाला दिया। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Valentine's Day Horror: Lover Kills Girlfriend, Self; Suicide Note Reveals Reason

Web Summary : Noida: On Valentine's Day, a couple was found dead in a car. The man killed the woman, then himself, citing betrayal in a suicide note about a broken marriage promise after a 15-year relationship. Police are investigating.