नोएडा हादरले! जंगलात सापडला तरुणीचा छिन्नविछिन्न मृतदेह; गळ्यावर जखमांच्या खुणा अन् अंगावर युनिफॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 09:07 IST2026-01-23T09:07:10+5:302026-01-23T09:07:48+5:30

दनकौर कोतवाली क्षेत्रातील मुतेयना गावाच्या जंगलात एका २५ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Noida shaken! Dismembered body of a young woman found in the forest; Wound marks on her neck and uniform on her body | नोएडा हादरले! जंगलात सापडला तरुणीचा छिन्नविछिन्न मृतदेह; गळ्यावर जखमांच्या खुणा अन् अंगावर युनिफॉर्म

नोएडा हादरले! जंगलात सापडला तरुणीचा छिन्नविछिन्न मृतदेह; गळ्यावर जखमांच्या खुणा अन् अंगावर युनिफॉर्म

नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरात गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दनकौर कोतवाली क्षेत्रातील मुतेयना गावाच्या जंगलात एका २५ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीच्या गळ्यावर जखमेच्या खुणा असून तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात फेकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

गुरुवारी सकाळी मुतेयना गावातील काही ग्रामस्थ जंगलातून जात असताना, त्यांना नाल्याच्या शेजारी एका तरुणीचा मृतदेह पडलेला दिसला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. माहिती मिळताच दनकौर पोलीस ठाण्याचे प्रभारी मुनेंद्र सिंह आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

अंगावरील कपड्यांवरून तपासाला दिशा 

मृत तरुणीचे वय साधारण २५ वर्षे असून तिच्या अंगावरील कपड्यांवरून ती एखाद्या सिक्युरिटी एजन्सीमध्ये कामाला असावी, असा संशय पोलिसांना आहे. तिच्या गळ्यावर असलेल्या खुणांमुळे तिचा गळा आवळून किंवा धारदार शस्त्राने हत्या केल्याची शक्यता दाट आहे. अद्याप तिची ओळख पटलेली नाही. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी आसपासच्या सर्व पोलीस ठाण्यांना माहिती दिली असून बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची तपासणी केली जात आहे.

नोएडा गुन्हेगारांसाठी 'डंपिंग ग्राऊंड' बनतंय? 

गेल्या काही दिवसांपासून नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरात बेवारस मृतदेह मिळण्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. २९ डिसेंबर रोजी सेक्टर १४२ मधील डंपिंग ग्राऊंडमध्ये एका तरुणीचा जळालेला मृतदेह सापडला होता. २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासूनही अद्याप तिची ओळख पटलेली नाही. काही दिवसांपूर्वी सेक्टर ३९ मध्ये एका तरुणीचा शिर नसलेला मृतदेह आढळला होता, ज्याने संपूर्ण दिल्ली-एनसीआर हादरले होते. या घटनांमुळे "गुन्हेगार हत्या कोठेही करतात आणि मृतदेह ठिकाणे लावण्यासाठी नोएडाच्या निर्जन भागाचा वापर करतात का?" असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

आरोपींना लवकरच जेरबंद करू! 

या प्रकरणावर बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आम्ही घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. तरुणीची ओळख पटताच हत्येचा गुंता सुटेल आणि आरोपींना आम्ही लवकरात लवकर बेड्या ठोकू."

Web Title : नोएडा में सनसनी: जंगल में युवती का क्षत-विक्षत शव बरामद

Web Summary : नोएडा के जंगल में 25 वर्षीय युवती का शव मिला। गर्दन पर चोट के निशान से हत्या की आशंका है। पुलिस सबूत मिटाने के लिए शव को जंगल में फेंकने का संदेह कर रही है। क्षेत्र में अज्ञात शवों की बढ़ती घटनाओं के बीच ग्रामीणों ने शव ढूंढ निकाला, जिससे नोएडा अपराधियों के लिए डंपिंग ग्राउंड बनने की आशंका बढ़ गई है।

Web Title : Noida Shaken: Dismembered Body of Young Woman Found in Forest

Web Summary : A 25-year-old woman's body was found in a Noida forest. With visible neck wounds, police suspect murder to conceal evidence. The body, found by villagers, has sparked concerns amid rising cases of unidentified bodies in the area, raising fears of Noida becoming a dumping ground for criminals.