Noida BJP Leader Murder: व्हॅलेंटाईन आधीच पत्नीने प्रियकरासोबत भाजप नेत्या पतीचा काटा काढला; कारण धक्कादायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 15:45 IST2022-02-13T15:42:22+5:302022-02-13T15:45:00+5:30
Noida BJP Leader Murder: पत्नीने तिच्या प्रियकरासोबत या नेत्याची हत्या केली. ओळख लपविण्यासाठी नेत्याचा मृतदेह जाळण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तीन दिवसांत तपास करत चार लोकांना अटक केली आहे.

Noida BJP Leader Murder: व्हॅलेंटाईन आधीच पत्नीने प्रियकरासोबत भाजप नेत्या पतीचा काटा काढला; कारण धक्कादायक
उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकीचे वारे आहेत. त्यातच नोएडातील एका भाजप नेत्याच्या पत्नीवर व्हॅलेंटाईन सवार झाला होता. निवडणुकीच्या वातावरणाचा फायदा उचलण्याच्या मनसुब्याने नेत्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला. स्थानिक भाजपा नेत्याची हत्या त्याला मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम आणि जमीन हडपण्यासाठी करण्यात आली.
पत्नीने तिच्या प्रियकरासोबत या नेत्याची हत्या केली. ओळख लपविण्यासाठी नेत्याचा मृतदेह जाळण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तीन दिवसांत तपास करत चार लोकांना अटक केली आहे. पोलीस उपायुक्त अमित कुमार यांनी सांगितलेकी, ९ फेब्रुवारीला भाजपाता बुथ अध्यक्ष वीरपाल यांची हत्या करण्यात आली. पोलीस ठाण्याचे अधिकारी राजकुमार सिंह यांच्या टीमने आरोपींना पकडले आहे. त्यांच्या चौकशीत वीरपालची पत्नी नेहा हिचे गेल्या तीन वर्षांपासून मुकेश उर्फ सोनूसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनीही मिळून वीरपालला वाटेतून हटविले.
त्यांनी सांगितले की याच दरम्यान नेहाला समजले की वीरपालला यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात एक कोटी रुपये आणि प्लॉट मिळणार आहे. या पैशाच्या आणि जमिनीच्या लालसेपोटी वीरपालच्या हत्येचा कट रचला गेला.
नेहा आणि मुकेशने वीरपालला मारण्यासाठी राजकुमार आणि भूदेव शर्मा यांना 50 हजार रुपये दिले. ९ फेब्रुवारीच्या रात्री चौघांनी त्याच गळा आवळून खून केला. त्यानंतर अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यानंतर मृतदेहावर रजई टाकून आरोपी पळून गेले. वीरपालला 13, 11 आणि 7 वर्षांची तीन मुले आहेत. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले, तेथून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.