ना दुचाकी मिळाली ना पैसे...ऑनलाईन दुचाकी खरेदीच्या नादात तरुणाला ५८ हजाराचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 03:52 PM2021-01-14T15:52:12+5:302021-01-14T15:53:20+5:30

Online fraud : याप्रकरणी गुरुवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No two-wheeler got, no money ... 58 thousand rupees to a young man for buying a two-wheeler online | ना दुचाकी मिळाली ना पैसे...ऑनलाईन दुचाकी खरेदीच्या नादात तरुणाला ५८ हजाराचा गंडा

ना दुचाकी मिळाली ना पैसे...ऑनलाईन दुचाकी खरेदीच्या नादात तरुणाला ५८ हजाराचा गंडा

Next
ठळक मुद्देसूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन योगेश तायडे हा मेडीकल एजन्सीवर कामाला आहे. त्याला जुनी दुचाकी खरेदी करायची असल्याने ओएलएक्स या ॲपवरुन त्याने एका जणाशी संपर्क साधला.

जळगाव : ओएलक्स या ऑनलाईन ॲपवरुन दुचाकी खरेदी करण्याच्या नादात योगेश विठ्ठल तायडे (२२,रा.हरिओम नगर) या तरुणाला ५८ हजार ३७३ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी गुरुवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन योगेश तायडे हा मेडीकल एजन्सीवर कामाला आहे. त्याला जुनी दुचाकी खरेदी करायची असल्याने ओएलएक्स या ॲपवरुन त्याने एका जणाशी संपर्क साधला. दुचाकीचा व्यवहार २२ हजार ठरल्यानंतर वाहनाचे कागदपत्रे तसेच तायडे याचे आधारकार्ड, फोटो  वैगरे कागदपत्रांची दोघांमध्ये व्हॉटसॲपवरुनच देवाणघेवाण झाली. त्याआधी ११ जानेवारी रोजी योगेश याने २१५० रुपये फोन पे वरुन पाठविले. त्यानंतर १२ जानेवारी रोजी सकाळी १०.५ वाजता योगेश याला मी इंडीयन आर्मी पोस्ट कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून एका व्यक्तीचा फोन आला. तुम्ही निम्मे पैसे पाठविल्याशिवाय दुचाकी मिळणार नाही असे या व्यक्तीने सांगितले. त्यामुळे योगेश याने एकवेळा ५ तर दुसऱ्यावेळी १० हजार रुपये फोन पे वरुन पाठविले. त्यानंतर परत त्याने सांगितल्याप्रमाणे ९ हजार ९२५ व नंतर ९ हजार १५० रुपये परत पाठविले. आणखी पैशाची मागणी झाल्याने मित्र भूषण सूर्यकांत सोनार याच्याही फोन पे वरुन ५ हजार ९९९ रुपये पाठविले असे वारंवार एकूण ५८ हजार ३७३ रुपये पाठविल्यावर आपली फसवणूक झाल्याचे योगेशच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने गुरुवारी शनी पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यावरुन फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
 

Web Title: No two-wheeler got, no money ... 58 thousand rupees to a young man for buying a two-wheeler online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.