राजकीय दबाव न येता एकही आरोपी सूटता कामा नये, पालकमंत्री असलम शेख यांनी घेतली मानपाडा पोलिसांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 20:50 IST2021-09-24T20:27:58+5:302021-09-24T20:50:05+5:30
Dombivali Gangrape : पालकमंत्री शेख यांनी आज सायंकाळी मानपाडा पोलिस ठाण्यात पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्यासह तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली.

राजकीय दबाव न येता एकही आरोपी सूटता कामा नये, पालकमंत्री असलम शेख यांनी घेतली मानपाडा पोलिसांची भेट
कल्याण - डोंबिवलीतील अल्पवयीन तरुणीचा छळ करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला आहे. तिचा व्हीडीओ काढून तिला ब्लॅकमेल केले आहे. या प्रकरणातील एकही आरोपी सूटता कामा नये. तसेच या प्रकरणात राजकीय दबाब येता कामा नये असे वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी आज येथे केले आहे.
पालकमंत्री शेख यांनी आज सायंकाळी मानपाडा पोलिस ठाण्यात पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्यासह तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीपश्चात त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपरोक्त माहिती दिली. पालकमंत्री शेख यांनी सांगितले की, हे प्रकरण आत्ता प्राथमिक पातळीवर आहे. या घटनेतील एकही आरोपी सूटता कामा नये. या प्रकरणाचा खटला न्यायालयाच्या फास्ट ट्रकवर चालविण्यात यावा. लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. जेणेकरुन यापूढे अशा प्रकारचा गंभीर गुन्हा करण्यास यापूढे महाराष्ट्रात कुणी धजावणार नाही.
डोंबिवली सामूहिक बलात्काराचा खटला जलदगती न्यायालयात चालविणार; एकनाथ शिंदेची माहितीhttps://t.co/A57HelqAXs
— Lokmat (@MiLOKMAT) September 24, 2021