नितेश राणेंचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज, उद्या होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 19:42 IST2021-12-27T19:42:11+5:302021-12-27T19:42:31+5:30
Nitesh Rane's application for anticipatory bail : याबाबत उद्या २८ डिसेंबर राेजी सुनावणी होणार असल्याची माहिती ॲड. रावराणे यांनी दिली.

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज, उद्या होणार सुनावणी
कणकवली : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात ॲड. राजेंद्र रावराणे यांच्या माध्यमातून धाव घेतली आहे. या अटकपूर्व जामीनावरील पहिली सुनावणी २७ डिसेंबरला होणार होती. याबाबत उद्या २८ डिसेंबर राेजी सुनावणी होणार असल्याची माहिती ॲड. रावराणे यांनी दिली.
आयपीसी ३०७ सारख्या गंभीर गुन्ह्यात आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयात मंजूर होणार की त्यासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागणार हे चित्र २८ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.