शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Nirbhaya Case: 'त्या' चौघांना एकत्र फासावर लटकवून जल्लाद पवनने मोडला पणजोबांचा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 12:16 PM

Nirbhaya Case : 20 मार्चला पहाटे ५.३० वाजता या चौघांना फासावर लटकवले आहे.

ठळक मुद्दे यासाठी पवन जल्लाद डमीला फासावर चढविण्यासाठी २ दिवस आधी तिहार तुरुंगात हजर झाला होता. हा माझ्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे. पूर्वजांनी आयुष्यात एका वेळीच एका किंवा दोन दोषींना फाशी दिली होती. मी माझ्या आयुष्यात पहिल्याच वेळी एकत्र चार-चार दोषींना फासावर लटकवले आहे.'

मेरठ - पूर्वजांचा वारसा म्हणून कोणाला संपत्ती मिळते तर कोणाला चांगले संस्कार मिळतात. उत्तर प्रदेशातील मेरठ या शहरातील एका व्यक्तीला वारसा म्हणून घराण्याचे परंपरेने चालत आलेले 'जल्लाद'चे काम मिळाले आहे. अशी चर्चा आहे की, याच कुटुंबातील पवन जल्लादची ही चौथी पिढी तिहार तुरुंगात निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशी दिली आहे. 20 मार्चला पहाटे ५.३० वाजता या चौघांना फासावर लटकवले आहे. यासाठी पवन जल्लाद डमीला फासावर चढविण्यासाठी २ दिवस आधी तिहार तुरुंगात हजर झाला होता. संपूर्ण जगात कोरोनाची पसरणारी दहशत पाहता त्यावेळी जल्लादाची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर यशस्वीपणे डमीला फासाच्या तख्तावर चढविण्यात आले.  

भारत देशात या कुटुंबातल्या लोकांना जल्लादांचं कुटुंब म्हणून ओळखले जाते. १९५० - ६० च्या दशकात या कुटुंबातील पहिल्या पिढीचे प्रमुख लक्ष्मण हे देशातील दोषींना फाशी देण्याचं काम करत होते. आता त्यांचा पणतू म्हणजेच लक्ष्मण यांचा मुलगा कालू राम जल्लाद यांच्या मुलाचा मुलगा पवन जल्लाद म्हणजेच या कुटुंबाची चौथी पिढी आयुष्यातली पहिली फाशी देण्याची तयारी करण्यात व्यस्त आहे.पाच दोषींच्या फाशीसाठी आजोबांना केली होती मदतपवन जल्लादने याआधी जवळपास पाच फाशींमध्ये आजोबा कालू राम जल्लाद यांची मदत केली होती. त्या पाच फाशींच्या वेळी पवन यांनी फाशी देण्याच्या प्रक्रियेतले सर्व बारकावे आजोबा कालू राम यांच्याकडून शिकून घेतले होते. आता निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फासावर लटकवणं हा पवन जल्लादसाठी पहिलाच अनुभव असणार आहे.फाशीसाठी वापरलेल्या दोराचं नंतर काय केलं जातं? याबाबत असलेली अंधश्रद्धा वाचून व्हाल अवाक्...

Nirbhaya Case: शेवटचे १५ तास, ४ कोर्ट अन् ६ याचिका; दोषींनी फाशी थांबवण्यासाठी काय केलं? ‘असा’ होता घटनाक्रम

हा माझ्या पूर्वजांचा आशीर्वादपवन जल्लाद म्हणाले की,  'मी निर्भयाच्या दोषींना फासावर फासावर चढविण्यासाठी तयार होतो. हा माझ्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे. पूर्वजांनी आयुष्यात एका वेळीच एका किंवा दोन दोषींना फाशी दिली होती. मी माझ्या आयुष्यात पहिल्याच वेळी एकत्र चार-चार दोषींना फासावर लटकवले आहे.'

Nirbhaya Case: सॅल्यूट! संयमाची 'सीमा' ढळू न देता न्यायालयात लढली; देशाची वाहवा मिळवली

 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपjailतुरुंग