Nirbhaya Case: शेवटचे १५ तास, ४ कोर्ट अन् ६ याचिका; दोषींनी फाशी थांबवण्यासाठी काय केलं? ‘असा’ होता घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 09:08 AM2020-03-20T09:08:26+5:302020-03-20T09:09:28+5:30

फाशी थांबवण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने सांगितले की, 4-5 तास आहेत, काय तथ्य असेल तर ते सांगावे

Nirbhaya Case: 6 petitions were filed in 4 courts in 15 hours, but all dismissed pnm | Nirbhaya Case: शेवटचे १५ तास, ४ कोर्ट अन् ६ याचिका; दोषींनी फाशी थांबवण्यासाठी काय केलं? ‘असा’ होता घटनाक्रम

Nirbhaya Case: शेवटचे १५ तास, ४ कोर्ट अन् ६ याचिका; दोषींनी फाशी थांबवण्यासाठी काय केलं? ‘असा’ होता घटनाक्रम

Next

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींच्या सहा अर्जांवर गेल्या 15 तासांत चार न्यायालयात सुनावणी झाली. त्यांच्या वकीलांनी मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत त्यांना शेवटचं वाचवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळून लावण्याच्या विरोधात मध्यरात्री दोन वाजता ते पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सर्वोच्च न्यायालयाने अडीच वाजता सुनावणी सुरू केली. सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर सव्वा तीन वाजता ही याचिका फेटाळून लावण्यात आली. दोषींनी कोर्टाबाहेर राष्ट्रपतींकडे दोन दया याचिका देखील दाखल केल्या पण त्याही फेटाळून लावल्या गेल्या.

दुपारी 12:45 वाजता

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सरकारी वकिलांनी म्हटले की दोन आरोपी पवन आणि अक्षय यांची दुसरी दया याचिकादेखील राष्ट्रपतींनी फेटाळून लावली. या चारही दोषींना कोणत्याही न्यायालयात फाशी होऊ नये म्हणून कोणताही कायदेशीर पर्याय नाही.

दुपारी 1:00 वाजता

बिहारच्या औरंगाबाद कोर्टाने निर्भया दोषी अक्षय सिंगच्या घटस्फोटाच्या अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली.

दुपारी 1: 15 वाजता

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने दोषींना फाशीवर स्थगिती देण्याच्या याचिकेवर निकाल 20 मार्च रोजी राखून ठेवला होता.

दुपारी 1:45 वाजता

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाबाहेर दोषी अक्षय सिंहची पत्नी चक्कर येऊन कोसळली

दुपारी 2:00 वाजता

दोषी मुकेश सिंह याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली. दुपारी अडीच वाजता सुनावणीची वेळ निश्चित करण्यात आली.

दुपारी 2: 45 वाजता

दोषी मुकेश सिंह याच्या याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला.

दुपारी 4:00 वाजता

राष्ट्रपतींनी दुसरी दया याचिका फेटाळून लावण्याला आव्हान देणारी अक्षय याची याचिका फेटाळून लावली.

रात्री 8:00 वाजता

या तिन्ही दोषींनी फाशीची शिक्षा थांबविण्यास नकार देणाऱ्या खालच्या कोर्टाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले.

रात्री 10.30 वाजता

दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की, दोषी अक्षयच्या पत्नीची घटस्फोट याचिका ही शिक्षा थांबविण्याचा आधार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सुनावण्यात आला होता. आम्ही त्याचे पुनरावलोकन करू शकत नाही. कोणीतरी यंत्रणेसोबत खेळत आहे. दया याचिका दाखल करण्यास अडीच वर्षे लागली. आपणास वाटत असेल तर तुम्ही पहाटे 5:30 पर्यंत वाद घालू शकता.

रात्री 12 वाजता उशीरा

दिल्ली उच्च न्यायालयाने तिन्ही दोषींना फाशी देणे थांबविण्याची याचिका फेटाळून लावली.

मध्यरात्री 2.00 वाजता

राष्ट्रपतींकडे केलेली दया याचिका फेटाळून लावण्याला निर्भयाच्या बलात्कारी पवन गुप्ता यानी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

'निर्भया आज नक्कीच आनंदी असेल, आम्हाला खऱ्या अर्थाने शांती मिळाली'

मध्यरात्री 2.30 वाजता

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. त्यानंतर पवन गुप्ता यानी युक्तिवाद केला की, गुन्हा होताना तो अल्पवयीन होता. तुमचा दावा खालच्या कोर्टाने, दिल्ली हायकोर्टाने आणि आमच्या कोर्टाने फेटाळला असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं

पहाटे 3.00 वाजता

सर्वोच्च न्यायालयाने सर्व युक्तिवाद फेटाळले. दोषी पवन गुप्ता याने फाशी एक किंवा दोन दिवस पुढे ढकलण्याची विनंती केली. तुरूंगात पोलिसांनी त्याला मारहाण केली असा युक्तिवाद त्याने केला होता. बेअंत सिंहच्या मारेकऱ्यांचा संदर्भ देऊन फाशी थांबविण्याची मागणी करण्यात आली.

पहाटे 3: 15 वाजता

45 मिनिटांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने दोषी पवन गुप्ता याची याचिका फेटाळून लावली. पवन आणि अक्षय यांना फाशी देण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांना 5-10 मिनिटे भेटण्याची परवानगी मिळाली

शेवटच्या अर्ध्या तासात काय घडले? दोषी रडले, गडागडा लोळले, मग फासावर चढले

पहाटे 5.30 वाजता

तिहार तुरुंगात या चारही दोषींना फाशी देण्यात आली.

फाशी थांबवण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने सांगितले की, 4-5 तास आहेत, काय तथ्य असेल तर ते सांगावे, आमच्याकडे खूप कमी वेळ बाकी आहे. आता वेळ आली आहे की तुमचे वकील देवाला भेटतील. तुमच्या अर्जामध्ये कोणतंही तथ्य नाही. तुमच्या फाशीला रोखलं जाऊ शकत नाही.

अखेर ‘तुला’ न्याय मिळाला; मुलीचा फोटो मिठीत घेत आई झाली भावूक, म्हणाली...

अखेर न्याय झाला! निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना पहाटे तिहार कारागृहात फाशी 

Web Title: Nirbhaya Case: 6 petitions were filed in 4 courts in 15 hours, but all dismissed pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.