Nirbhaya Case: अखेर ‘तुला’ न्याय मिळाला; मुलीचा फोटो मिठीत घेत आई झाली भावूक, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 07:44 AM2020-03-20T07:44:03+5:302020-03-20T07:55:21+5:30

Nirbhaya Case: आमच्या मुलीने जितका त्रास सहन केला आहे तो देशातील इतर कोणत्याही मुलीला होऊ नये.

Nirbhaya Case: I hugged my daughter's picture & 'finally you got justice Said Nirbhaya Mother Ashadevi pnm | Nirbhaya Case: अखेर ‘तुला’ न्याय मिळाला; मुलीचा फोटो मिठीत घेत आई झाली भावूक, म्हणाली...

Nirbhaya Case: अखेर ‘तुला’ न्याय मिळाला; मुलीचा फोटो मिठीत घेत आई झाली भावूक, म्हणाली...

Next
ठळक मुद्देआरोपींच्या फाशीनंतर अनेकांना धडा मिळेलजे देशातील मुलींना लक्ष्य करतात त्यांना सोडलं जाणार नाहीदेशातील मुलींसाठी हा लढा सुरूच राहील

नवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यात आली आहे. या आरोपींना फाशी दिल्यानंतर राजधानी दिल्लीत उत्साहाचं वातावरण तयार झालं. अनेकांनी हा आनंद साजरा केला. आपल्या मुलीला न्याय मिळाल्यानंतर निर्भयाची आई आशा देवीही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर तुला न्याय मिळाला. हा दिवस देशातील मुलींना समर्पित आहे. मी न्यायालयीन व सरकारचे आभार मानते अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

यावेळी आशा देवी म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयातून परत जाताना मी प्रथम माझ्या मुलीच्या फोटोला मिठी मारून तुला न्याय मिळाला आहे. आमच्या मुलीने जितका त्रास सहन केला आहे तो देशातील इतर कोणत्याही मुलीला होऊ नये. म्हणून आम्ही तिच्या मृत्यूनंतरही ही दीर्घ लढाई सुरुच ठेवली. त्यांना अखेर फाशी देण्यात आली, बलात्कार पीडित आरोपींना देशात प्रथमच फाशी देण्यात आली असं त्यांनी सांगितले.

तसेच गुन्हेगारांना वाचविण्यासाठी ज्या पद्धतीने एक याचिका ठेवण्यात आली होती, त्यानुसार कोर्टाने सर्व याचिका एक-एक करून फेटाळून लावल्या, पण शेवटी मला न्याय मिळाला. अगदी उशीरा, पण आमच्या न्यायव्यवस्थेने हे सिद्ध केले की जे देशातील मुलींना लक्ष्य करतात त्यांना सोडलं जाणार नाही. राज्यघटनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होते. पण, या कारवाईमुळे देशाच्या न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा विश्वास कायम राहील हे सिद्ध झालं. आम्ही निर्भयाला न्याय मिळावा म्हणून लढा देत होतो पण देशातील मुलींसाठी हा लढा सुरूच राहील असंही आशादेवी म्हणाल्या.

दरम्यान, चौघांना फाशी दिल्यानंतर कुटुंबातील सदस्य आपल्या मुलांना नक्कीच शिकवतील. या आरोपींच्या फाशीनंतर अनेकांना धडा मिळेल, यापुढे असं कृत्य कोणी करणार नाही ही अपेक्षा आहे. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे, तिच्या नावाने तिच्या आईला हे जग ओळखू लागले.  मी तिला वाचवू शकले नाही. फक्त हेच की आईच्या प्रेमाचा धर्म आज पूर्ण झाला. आपल्या आजूबाजूला काही घडल्यास पीडित महिलेस मदत करा. निर्भयाचा खटला उशीर झाला मात्र यापुढे अशा प्रकरणातील दया याचिका एकत्रितपणे दाखल होऊ नयेत अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली.

Web Title: Nirbhaya Case: I hugged my daughter's picture & 'finally you got justice Said Nirbhaya Mother Ashadevi pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.