फाशीसाठी वापरलेल्या दोराचं नंतर काय केलं जातं? याबाबत असलेली अंधश्रद्धा वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 09:24 AM2020-03-20T09:24:54+5:302020-03-20T09:34:35+5:30

फाशीबाबत तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. यासाठी ट्रायल, दोरी तयार करण्याच्या बातम्यांचीही चर्चा होत होती.

Nirbhaya Case : What happens to the rope after hanged api | फाशीसाठी वापरलेल्या दोराचं नंतर काय केलं जातं? याबाबत असलेली अंधश्रद्धा वाचून व्हाल अवाक्...

फाशीसाठी वापरलेल्या दोराचं नंतर काय केलं जातं? याबाबत असलेली अंधश्रद्धा वाचून व्हाल अवाक्...

Next

निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यात आली आहे. या आरोपींना फाशी दिल्यानंतर राजधानी दिल्लीत उत्साहाचं वातावरण तयार झालं. अनेकांनी हा आनंद साजरा केला. आपल्या मुलीला न्याय मिळाल्यानंतर निर्भयाची आई आशा देवीही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 

फाशीबाबत तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. यासाठी ट्रायल, दोरी तयार करण्याच्या बातम्यांचीही चर्चा होत होती. तशीच एक चर्चा आता होत आहे की, फाशी दिल्यानंतर त्या दोराचं काय केलं जातं? असा एक प्रश्न अनेकांना पडतोय. 

मुळात हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण फाशी देण्यासाठी वापरलेल्या दोराबाबत अनेक अंधश्रद्धा लोकांच्या मनात आहेत. सामान्यपणे हा दोर फाशी देऊन झाल्यावर सुरक्षित एका बॉक्समध्ये ठेवला जातो. पण यासंबंधी अनेक किस्सेही आहेत.

जल्लाद नाटा मल्लिकने दोरीचे तुकड्यातून केली होती कमाई

2004 मध्ये नाटा मल्लिकने बलात्कार आणि खूनाचा दोषी धनंजय चॅटर्जीला फासावर लटकवलं होतं. त्यावेळी वापरण्यात आलेल्या दोराचे तुकडे विकून नाटाने रग्गड कमाई केली होती. त्यावेळी अशी अंधश्रद्धा पश्चिम बंगालमध्ये होता की, या दोराचं लॉकेट बनवून गळ्या घातलं तर नशीब बदलतं.

म्हणजे त्यावेळी लोकांमध्ये अशी अंधश्रद्धा होती की, या दोरापासून तयार लॉकेट घातलं तर काहीतरी चांगलं होईल. मग ते नोकरी मिळणं असो वा उद्योगात फायदा. या अंधश्रद्धेचा फायदा घेत नाटा मल्लिकने त्याच्या असलेल्या एका दोरीचे तुकडे विकले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेव्हा त्याने एका लॉकेटसाठी लागणाऱ्या दोरीची 2 हजार रूपये किंमत घेतली होती. तर जुन्या दोराची किंमत त्याने 500 रूपये ठेवली होती. 

ब्रिटनमध्येही अंधश्रद्धा

फाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या दोराबाबत ही अंधश्रद्धा कुठून आली याचा काही ठोस पुरावा नाही. पण असे अनेक प्रमाण आहेत की, ब्रिटनमध्ये या दोरांबाबत पूर्वीपासून काही मान्यता होत्या. ब्रिटनमध्ये जेव्हा फाशी दिली जात होती तेव्हा ही दोरी जल्लादाला दिली जात होती.

नंतर ब्रिटनमध्ये लोकांमध्ये असा समज झाला की, या दोरीचा  तुकडा घरात ठेवला किंवा त्यांचं लॉकेट घातलं तर नशीब बदलतं. अशाही आख्यायिका आहेत की, ब्रिटनमध्ये जल्लाद या दोरीचे तुकडे विकत होते आणि लोक ते आनंदाने खरेदी करत होते. आता तर ब्रिटनमध्ये फाशी देणं बंद आहे.

आणखी एक अंधश्रद्धा

फाशीचा तख्त आणि दोराबाबत अनेक अंधश्रद्धा आणि कथा आहे ज्या हैराण करून सोडतात. काही मान्यता अशाही आहेत की, जर एखाद्या व्यक्तीच्या जन्म-कुंडलीत तुरूंगात जाण्यात योग असेल आणि त्या व्यक्तीने जर फाशीच्या तख्ताचं लाकूड हाताला बांधलं तर त्याचं तुरूंगात जाणं टळतं.

या अशा अंधश्रद्धा भारतात गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. लोक त्याचे बळीही पडतात. पण मुख्य मुद्दा हा आहे की, दोषींना शिक्षा दिली गेली आहे. जेणेकरून अशाप्रकारचे गुन्हे कुणी करणार नाहीत.

Web Title: Nirbhaya Case : What happens to the rope after hanged api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.