शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

Nirbhaya Case: 'त्या' एकाला सोडून बाकीच्यांना उद्या फाशी देता येईल; तिहार जेल 'तय्यार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 13:26 IST

Nirbhaya Case : या अर्जाला तिहार तुरुंग प्रशासनाने आज शुक्रवारी दिल्ली कोर्टात आव्हान दाखल केले.

ठळक मुद्देतीन दोषींनी १ फेब्रुवारीला दिल्या जाणाऱ्या फाशीला स्थगिती मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता.एका दोषींची दया याचिका प्रलंबित असून उर्वरित तीन दोषींना डेथ वॉरंटने दिलेल्या तारीख आणि वेळेनुसार फासावर लटकवू शकतो. - तिहार तरुंग प्रशासन

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीन दोषींनी १ फेब्रुवारीला दिल्या जाणाऱ्या फाशीला स्थगिती मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता. या अर्जाला तिहार तुरुंग प्रशासनाने आज शुक्रवारी दिल्ली कोर्टात आव्हान दाखल केले.या याचिकेला विरोध करत तुरुंग प्रशासनाने अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. धर्मेंदर राणा यांना सांगितले की, २०१२ निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील एका दोषीची दया याचिका प्रलंबित असून उर्वरित तीन दोषींना डेथ वॉरंटने दिलेल्या तारीख आणि वेळेनुसार फासावर लटकवू शकतो. 

सरकारी वकील इरफान अहमद हे आज तिहार तुरुंग प्रशासनाच्या वतीने कोर्टात हजर होते. त्यांनी विनय शर्मा या एका दोषींची दया याचिका प्रलंबित असून उर्वरित तीन दोषींना फाशी दिली जाऊ शकते. यात काहीही बेकायदेशीर बाब नसल्याचे त्यांनी पुढे सांगितले. 

Nirbhaya Case : तुरुंगात मुकेशचा लैंगिक छळ झाला; वकिलांचा खळबळजनक दावा

दोषीचा वकील ए. पी. सिंग यांनी सांगितले, नियमांनुसार एकाची दया याचिका प्रलंबित असेल तर इतरांना फाशी दिली जाऊ शकत नाही.  सिंग यांनी न्यायालयाला सुरु असलेला खटला पुढे ढकलण्यासाठी युक्तिवाद केला. फाशीची शिक्षा ठोठावलेल्या दोषींच्या फाशीला स्थगिती मिळावी म्हणून केलेल्या याचिकेवर उत्तर मागविण्यासाठी कोर्टाने गुरुवारी म्हणजेच काल तुरूंग प्रशासनाला नोटीस बजावली होती. दोषी पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार या दोषींची बाजू मांडणारे वकील सिंग यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले की, काही दोषींना कायदेशीर उपायांचा अजूनपर्यंत वापर करून घ्यायचा असल्याने फाशीची अंमलबजावणी पुढे ढकलावी.

Nirbhaya Case : आता विनयने केला दयेचा अर्ज; पुन्हा फाशीच्या शिक्षेची तारीख लांबणीवर जाणार?

Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली 

निर्भयाच्या चारही दोषींना (मुकेश (३२), पवन (२५), विनय (२६) आणि अक्षय (३१)) २२ जानेवारीऐवजी आता १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता फासावर चढविले जाणार आहे, असे आदेश दिल्ली कोर्टाने दिले आहे. कोर्टाने नवीन डेथ वॉरंट जारी केला आहे. बुधवारी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि कायदेशीर शेवटच्या पर्यायाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फोल ठरला. दोषी मुकेश कुमार सिंहाच्या याचिकेवर समीक्षा अथवा कोणताही विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दर्शवला.

Nirbhaya Case : मुकेशची फाशी निश्चित, सर्व कायदेशीर पर्याय संपले

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालयNew Delhiनवी दिल्लीjailतुरुंग