Nirbhaya Case: Mukesh's Advocate claimed he had sexual assaulted in Tihar jail | Nirbhaya Case : तुरुंगात मुकेशचा लैंगिक छळ झाला; वकिलांचा खळबळजनक दावा
Nirbhaya Case : तुरुंगात मुकेशचा लैंगिक छळ झाला; वकिलांचा खळबळजनक दावा

ठळक मुद्दे या प्रकरणात मुकेश या दोषीची वैद्यकीय स्थिती ठीक आहे.कधीकधी, वैद्यकीय आरोग्य आणि मृत्यूदंडातील दोषींची प्रकृती बिघडली असेल तर त्यांना मृत्युदंड ठोठावला जाऊ शकत नाहीसुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात मुकेशच्या वकील अंजना प्रकाश यांनी तिहार तुरुंगात मुकेशचा लैंगिक छळ केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. 

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषींपैकी एक मुकेशच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान आज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगिती दिली होती. दोषी मुकेशने १ फेब्रुवारीचा डेथ वॉरंट टाळण्यासाठी आणि राष्ट्रपतींची दया याचिका फेटाळल्याच्या विरोधात अपील दाखल केले होते. दिल्लीच्या कोर्टाने चारही दोषींच्या फाशीसाठी १ फेब्रुवारीची मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोषीच्या अपिलावर सर्वोच्च सुनावणी घेण्यास काल सहमती दर्शवली आणि आज त्यावर सुनावणी सुरु करण्यात आली. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात मुकेशच्या वकील अंजना प्रकाश यांनी तिहार तुरुंगात मुकेशचा लैंगिक छळ केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. 

तसेच दोषी मुकेशच्या वकील न्यायालयात म्हणाले, तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर आपले मन लावावे लागेल. आपण एखाद्याच्या आयुष्यासह खेळत आहात. तुरूंगात आल्यानंतर मुकेशला निर्दयपणे मारहाण करण्यात आली. त्याचप्रमाणे, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केले की, कधीकधी, वैद्यकीय आरोग्य आणि मृत्यूदंडातील दोषींची प्रकृती बिघडली असेल तर त्यांना मृत्युदंड ठोठावला जाऊ शकत नाही, परंतु या प्रकरणात मुकेश या दोषीची वैद्यकीय स्थिती ठीक आहे.

Web Title: Nirbhaya Case: Mukesh's Advocate claimed he had sexual assaulted in Tihar jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.