हिंजवडीत मोबाईल दुकानातून साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 16:11 IST2019-07-06T16:09:34+5:302019-07-06T16:11:21+5:30
मोबाईल शॉपीचा पत्रा उचकटून विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, लॅपटॉप व रोकड असा साडेनऊ लाखांचा ऐवज चोरी केला.

हिंजवडीत मोबाईल दुकानातून साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास
हिंजवडी : मोबाईल शॉपीचा पत्रा उचकटून विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, लॅपटॉप व रोकड असा साडेनऊ लाखांचा ऐवज चोरी केला. आयटीनगरी हिंजवडीतील शिवाजी चौकाजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दुकान मालक कमलेश भजनदास लेखवाणी (वय, ३१ रा. साईवैष्णवी धाम, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी कमलेश लेखवाणी यांचे हिंजवडीतील शिवाजी चौकात मोबाईल फोन विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी (दि. ४) रात्री साडेअकरा ते शुक्रवारी (दि. ५) सकाळी पावणेदहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा पत्रा आणि प्लायवूड उचकटून ८ लाख ६९ हजार रुपयांचे विविध कंपन्यांचे मोबाईल, लॅपटॉप व ९० हजाराची रोकड चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.