Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:07 IST2025-08-26T12:05:54+5:302025-08-26T12:07:58+5:30

Nikki Murder Case : निक्की हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. निक्कीचा पती विपिनने हुंड्यासाठी तिला मारहाण केली, नंतर तिला जाळून मारलं.

nikki murder case dowry harassment fortis hospital burn cause cylinder explosion | Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

ग्रेटर नोएडाचं निक्की हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. निक्कीचा पती विपिनने हुंड्यासाठी तिला मारहाण केली, नंतर तिला जाळून मारलं. घटनेच्या दिवशी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी निक्कीला उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे कुटुंबाने खोटं सांगितलं की, सिलिंडरचा स्फोट झाल्याने निक्की भाजली आहे.

जेव्हा पोलीस घटनास्थळी गेले तेव्हा सिलिंडरचा स्फोट झाल्याचे कोणतेही पुरावे घटनास्थळी सापडले नाहीत. उलट घटनास्थळी थिनरची बाटली आणि एक लाईटर सापडला. सिलिंडर स्फोटाबद्दल कोणी सांगितलं याबाबत आता तपास केला जात आहे. पोलीस फोर्टिस हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज देखील घेतील. जेणेकरून पोलिसांना रुग्णालयात कोण उपस्थित होतं हे कळू शकेल.

फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा

घटनेच्या वेळी उपस्थित असलेली निक्कीची बहीण कांचन हिने सांगितलं होतं की, निक्कीची सासू आणि पतीने तिला आग लावली आणि पळून गेले. शेजारी राहणारा देवेंद्र निक्कीला रुग्णालयात घेऊन गेला होता. आता पोलिसांना रुग्णालयातील सीसीटीव्हीवरून समजेल की तिला रुग्णालयात नेमकं कोणी नेलं होतं. तसेच रुग्णालयात कोण उपस्थित होतं.

"दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील

पोलिसांना दिलेल्या जबाबात, सासू आणि सासऱ्यांनी सांगितलं आहे की, ते स्वतः निक्कीला रुग्णालयात घेऊन गेले. जर आम्ही आग लावली असती तर आम्ही तिला रुग्णालयात का नेलं असतं? पोलिसांनी कांचनचा जबाबही घेतला आहे. ज्यामध्ये कांचनने सांगितलं आहे की, व्हायरल झालेल्या भांडणाचा व्हिडिओ ११ फेब्रुवारीचा आहे.

हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक

"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा

पोलिसांनी कांचनचा मोबाईलही तपासला. त्यावरून असं आढळून आलं की निक्की आगीत जळत असतानाचा व्हिडीओ संध्याकाळी ५:४५ वाजता रेकॉर्ड केला होता. याचा अर्थ निक्कीला संध्याकाळी ५:४४ वाजता जाळण्यात आलं असावं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
 

Web Title: nikki murder case dowry harassment fortis hospital burn cause cylinder explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.