ग्रेटर नोएडाच्या निक्की हत्याप्रकरणात पोलिसांनी आता सासऱ्यालाही अटक केली आहे. या प्रकरणात ही चौथी अटक आहे. यापूर्वी पोलिसांनी दीर रोहित भाटीला अटक केली. तर आधी पती विपिन आणि सासूला रविवारी अटक करण्यात आली होती. २२ ऑगस्ट रोजी कसना पोलीस ठाण्यात या सर्वांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेतला होता.
निक्कीचा पती विपिनचा पोलिसांनी एन्काउंटर केला. ज्वलनशील पदार्थ जप्त करण्यासाठी पोलीस त्याला घेऊन जात असताना त्याने पोलीस टीममधील एका पोलिसाचं पिस्तूल हिसकावून घेतलं आणि पळून जाऊ लागला. त्याच वेळी पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला आणि विपिनच्या पायाला गोळी लागली.
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
पोलिसांनी गोळी झाडताच विपिन पडला आणि पोलिसांनी त्याला पकडलं. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच वेळी विपिनला अटक केल्यानंतर पोलिसांनी सासूलाही अटक केली. हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारण्यात आलं. तिला जाळल्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु तिला वाचवता आलं नाही.
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
घटनेनंतर, निक्कीच्या वडिलांनी प्रकरणाची माहिती देताना सांगितलं होतं की, सासरच्यांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत होत्या. त्यांनी आमच्याकडून ३६ लाख रुपयांचा हुंडा मागण्यास सुरुवात केली. २०१६ मध्ये दोन्ही बहिणींचं एकाच कुटुंबात लग्न लावून देण्यात आलं. निक्कीचं लग्न विपिन भाटीशी झालं होतं आणि कांचनचं लग्न रोहित भाटीशी झालं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.