ग्रेटर नोएडातील निक्की भाटी हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा रंगली आहे. या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. निक्की आणि तिची बहीण कांचन यांचे पती केवळ हुंड्यावरूनच नव्हे तर रील बनवण्यावरून आणि ब्युटी पार्लर चालवण्यावरूनही सतत त्यांच्याशी भांडत असत. त्यांना त्रास देत असत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणी कांचनच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून रील आणि व्हिडीओ अपलोड करायच्या. विपिन आणि त्याचा भाऊ रोहित याला आक्षेप घेत असत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी या प्रकरणावरून जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की दोन्ही बहिणी त्यांच्या माहेरी गेल्या. १८ मार्च रोजी पंचायत बोलावण्यात आली ज्यामध्ये दोन्ही पक्षांनी आपलं मत मांडलं.
"दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
पंचायतीत असं ठरलं की, आता बहिणी रील आणि व्हिडीओ बनवणार नाहीत. परंतु काही काळानंतर, दोन्ही बहिणींनी पुन्हा व्हिडीओ आणि रील बनवण्यास सुरुवात केली आणि निक्कीनेही तिचे पार्लर सुरू ठेवलं. यामुळे पुन्हा वाद सुरू झाला आणि वाद वाढतच गेला. पोलीस चौकशीदरम्यान निक्कीचे सासरे सतवीर यांनी सांगितलं की ते घटनेच्या वेळी घरी नव्हते. सासू दयाने सांगितलं की ती काही कामासाठी बाहेर गेली होती.
हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांद्वारे सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. निक्कीचे वडील भिखारी सिंह यांनी सांगितलं की, त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात कुटुंबाच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त खर्च केला. मुलीच्या आनंदासाठी त्यांनी सासरच्यांना स्कॉर्पिओ कार, बुलेट आणि सोन्या-चांदीचे दागिने दिले. पण तरी ते कधी मर्सिडीजची मागणी करत होते तर कधी रोख रक्कम. आतापर्यंत ३६ लाख रुपयांपर्यंतची मागणी करण्यात आली होती.
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
भिखारी सिंह यांनी असंही सांगितलं की, त्यांनी त्यांची मुलगी निक्कीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत केली आणि तिच्यासाठी ब्युटी पार्लर सुरू केलं. मुलीचे आयुष्य सुरक्षित आणि स्वावलंबी होईल अशी आशा होती. पण जावई विपिनने तिथून पैसे चोरायला सुरुवात केली. वडिलांनी सांगितले की दोन्ही जावई कोणतेही काम करत नव्हते. ते सतत पैशाची मागणी करत होते आणि दबाव आणत होते. त्यांनी मुलींच्या पार्लरमधूनही चोरी करायला सुरुवात केली.