ग्रेटर नोएडा येथील रहिवासी निक्की भाटीच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. निक्कीचे वडील भिखारी सिंह म्हणाले की, आम्ही आमच्या मुलींच्या लग्नात कोणतीही कसर सोडली नाही. पण तरीही माझ्या मुलीचा जीव घेण्यात आला, आमचा आनंद हिरावून घेतला. निक्कीच्या लग्नात स्कॉर्पिओ, बुलेट आणि सोन्या-चांदीचे दागिने दिले.
भिखारी सिंह यांनी आरोप केला की, सासरचे लोक मर्सिडीजची मागणी करायचे, तर कधी लाखो रुपये रोख देण्यासाठी दबाव आणायचे. ३६ लाख रुपयांपर्यंतची मागणी करण्यात आली. अनेक वेळा पंचायत बोलावण्यात आली, पण निकाल लागला नाही. वडिलांनी पुढे सांगितलं की, त्यांनी निक्कीला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यास मदत केली आणि तिच्यासाठी ब्युटी पार्लर सुरू करून दिलं.
हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
मुलीचं आयुष्य सुधारेल अशी आशा होती. परंतु जावई विपिनने तिथून पैसे चोरण्यास सुरुवात केली. दोन्ही जावई कोणतंही काम करत नव्हते. फक्त पैसे मागणे आणि मुलींवर दबाव आणणे ही त्यांची सवय होती. त्यांनी मुलींच्या पार्लरमधूनही पैसे चोरण्यास सुरुवात केली. २१ तारखेची रात्र निक्कीच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरली.
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी निक्कीला तिचा पती विपिन आणि सासरच्यांनी खूप मारहाण केली. मोठी बहीण कांचन म्हणाली की, निक्कीला आधी मारहाण करण्यात आली. ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिच्यावर ज्वलनशील पदार्थ ओतण्यात आले आणि तिला आग लावण्यात आली. शेजाऱ्यांनी कसंबसं निक्कीला वाचवलं आणि जवळच्या रुग्णालयात, नंतर फोर्टिस आणि नंतर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच निक्कीचा मृत्यू झाला.
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
निक्कीच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो म्हणत आहे की, पप्पांनी मम्मीला लाईटरने जाळून मारलं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. मुलीच्या मृत्यूमुळे दुःखी झालेले वडील भिखारी सिंह म्हणाले की, सरकारने या प्रकरणात कठोर कारवाई करावी. ज्या घरात माझ्या मुलीला जाळलं गेलं ते घरही बुलडोझरने पाडावं अशी मागणी आहे. जर असं झालं नाही तर आम्ही उपोषण करू.