Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 16:36 IST2025-08-26T16:36:03+5:302025-08-26T16:36:59+5:30
निक्की भाटी हत्याकांडामुळे अवघ्या देश हादरला आहे. या प्रकरणात आता वेगवेगळे धक्कादायक खुलासे होत आहेत.

Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
निक्की भाटी हत्याकांडामुळे अवघ्या देश हादरला आहे. या प्रकरणात आता वेगवेगळे धक्कादायक खुलासे होत आहेत. विपिन भाटीची अनेक कृत्य आता समोर येत असून, यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. आधीच विवाहित असताना देखील विपिन भाटीच्या दोन गर्लफ्रेंड्स होत्या. यातील एका मुलीने विपिन विरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. निक्कीशी लग्नानंतर विपिनचे बाहेर अफेअर्स होते. या गर्लफ्रेंडला त्याने लग्नाचे वचन देखील दिले होते. दोघांचे लग्न होणार होते, पण त्याआधीच मुलीला विपिन आणि निक्कीच्या लग्नाबद्दल कळले.
विपिनच्या लग्नाबद्दल कळताच गर्लफ्रेंडने त्याच्याशी वाद घातला होता. यादरम्यान विपिनने तिला मारहाण केली होती. या प्रकारानंतर त्या मुलीने विपिनविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. विपिनने याच गर्लफ्रेंडसाठी निक्कीला आपल्या मार्गातून दूर करण्याचा प्रयत्न केला होता. विपिनने निक्कीला इलेक्ट्रिक शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केलेला. मात्र, निक्की बचावली होती. पोलिसांच्या चौकशीत विपिनने या अफेअरची कबुली दिली आहे. आता पोलीस त्या मुलीचीही चौकशी करणार आहेत.
विपिनच्या कारमध्ये दिसलेली 'मिस्ट्री गर्ल'
विपिनच्या आयुष्यात आणखी एका 'मिस्ट्री गर्ल'ची एंट्री झाली होती. गेल्या वर्षीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये विपिनच्या कारमध्ये एक मुलगी बसलेली दिसत आहे. निक्कीच्या कुटुंबियांनी सांगितले की, हा व्हिडीओ तेव्हाचा आहे जेव्हा निक्कीने विपिनला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी दोघांमध्ये मोठा वाद झाला होता, पण समाजात बदनामीच्या भीतीने विपिनने निक्कीची माफी मागितली होती आणि प्रकरण शांत झाले होते.
विपिन रात्र-रात्रभर बाहेर, निक्कीला करायचा मारहाण!
निक्कीची बहीण कंचननेही सांगितले की, विपिनचे अनेक मुलींसोबत संबंध होते. तो रात्र-रात्रभर घराबाहेर राहायचा. जेव्हा निक्की त्याला जाब विचारायची, तेव्हा तो तिला मारहाण करायचा. गावातील लोकांनीही सांगितले की विपिन कामधंदा न करता रात्री डिस्कोमध्ये जायचा. एवढेच नाही तर, त्याने निक्कीला घरखर्चासाठी पैसे देणेही बंद केले होते.
विपिनच्या अनेक अफेअर्समुळे आणि त्याच्या मारहाणीमुळे निक्की खूप त्रस्त होती. पोलिसांनी विपिनच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा मिळवण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेतली आहे, ज्यामुळे या प्रकरणातील अधिक माहिती बाहेर येईल.