शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

बापरे! १५०० रुपयांसाठी निहंगच्या वेशात आलेल्या लुटारूंनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हात कापला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 15:42 IST

Robbery Case : जखमी कर्मचाऱ्याला आसपास राहण्याऱ्या नागरिकांनी अमनदीप रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली. घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद झाले होते.मंगळवारी आरोपी दुचाकीवरुन नंगली गावात पोहोचली. आनंदने दोन ठिकाणाहून १५०० रुपये जमा केले होते. अमनदीप रुग्णालयात जखमीवर १२ तास शस्त्रक्रिया चालली. त्यानंतर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून हात जोडला आहे.

अमृतसरच्या कंबो पोलिस ठाण्यांतर्गत नंगली गावाजवळील मजीठा रोडवर फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. लुटारूंनी त्या कर्मचाऱ्याचा हात कापल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्याच्या बॅगेत फक्त १५०० रुपये होते. जखमी कर्मचाऱ्याला आसपास राहण्याऱ्या नागरिकांनी अमनदीप रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली. घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद झाले होते. दुसरीकडे कंबो पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक यादविंदर सिंग यांनी सांगितले की, आरोपींना अटक करण्यासाठी छापा टाकला जात आहे. पश्चिम बंगालच्या चुंगी करवा येथील रहिवासी आनंद विश्वास हा अमृतसरमधील आकाश अ‍ॅव्हेन्यू येथे राहतो. जवळजवळ दोन वर्षे तो एका फायनान्स कंपनीत पैसे वसूल करण्यासाठी काम करतो. तो दररोज बाईक चालवित मजीठा आणि अमृतसरशी संबंधित खेड्यात जात असे, पैसे गोळा करीत असे आणि संध्याकाळी हे पैसे मालकाकडे सुपूर्द करत असे.मंगळवारी आरोपी दुचाकीवरुन नंगली गावात पोहोचली. आनंदने दोन ठिकाणाहून १५०० रुपये जमा केले होते. तो नंगली गावातून बाहेर येताच दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्याचा पाठलाग सुरू केला. दुचाकी चालवणाऱ्याच्या मागे बसलेल्या तरूणाने निहंगचा वेश केला होता. संधी मिळताच आरोपींनी आनंदाला घेरले आणि दुचाकीच्या हँडलवर लटकलेली बॅग लुटण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याने बॅग देण्यास विरोध केला तेव्हा निहंगच्या वेशात असलेल्या तरूणाने कृपाणने त्याचा हात मनगटापासून वेगळा केला. नंतर दुचाकीस्वार पिशव्या हिसकावून पळ काढला.

अमनदीप रुग्णालयात जखमीवर १२ तास शस्त्रक्रिया चालली. त्यानंतर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून हात जोडला आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :RobberyचोरीPunjabपंजाबwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसcctvसीसीटीव्हीtwo wheelerदुचाकी