काही दिवसांपूर्वीच घरात आलेली नवी नवरी दिराच्या पडली प्रेमात, दोघांचा कारनामा पाहून पती 'कोमात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 16:40 IST2022-03-09T16:37:58+5:302022-03-09T16:40:55+5:30
Uttar Pradesh : घरातील लोकांना जेव्हा याबाबत समजलं तर सगळेच अवाक् झाले. नंतर महिलेच्या पतीने पोलिसात याबाबत तक्रार दिली. सध्या परिसरात याच घटनेची चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वीच घरात आलेली नवी नवरी दिराच्या पडली प्रेमात, दोघांचा कारनामा पाहून पती 'कोमात'
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या पीलीभीत जिल्ह्यातून एक अजब घटना समोर आली आहे. इथे २० दिवसांपूर्वी नवरी बनून आलेली महिला तिच्या दिराच्या प्रेमात पडली. केवळ २० दिवसात दोघे असे काही प्रेमात पडले की, दोघांनीही पळून जाण्याचा प्लान केला. एक दिवस संधी मिळताच दोघेही फरार झाले. घरातील लोकांना जेव्हा याबाबत समजलं तर सगळेच अवाक् झाले. नंतर महिलेच्या पतीने पोलिसात याबाबत तक्रार दिली. सध्या परिसरात याच घटनेची चर्चा रंगली आहे.
पूरनपूर गावातील ही घटना आहे. या गावातील एका तरूणाचं लग्न पीलीभीतमध्ये राहणाऱ्या तरूणीसोबत झालं होतं. या लग्नामुळे परिवारासोबतच परिसरातही आनंदाचं वातावरण होतं. भरपूर पाहुणे आणि नवरी-नवरदेवाला आशीर्वाद दिले. पण कुणालाही अंदाज नव्हता की, वहिनी आणि दिराची मस्करी प्रेमात बदलेल. कुटुंबियांनुसार, एक दिवस नवविवाहिता तिच्या दिरासोबत फरार झाली. हे समजताच सगळेच हैराण झाले. आरोप असाही आहे की, पळून जाताना नवरीने दागिनेही नेलेत.
मीडिया रिपोर्टनुसार, पतीने तक्रारीत सांगितलं की, पत्नी तिच्यासोबत दागिनेही घेऊन गेली. त्याने पोलिसांना सांगितलं की त्याच्या चुलत भावाने हा कारनामा केला. पतीने पत्नीला शोधून काढण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. पती म्हणाला की, त्याचा चुलत भाऊ सतत त्याच्या घरी येत होता. तो माझ्या पत्नीसोबत थट्ट्याच्या नात्याने गंमत करत होता. पण कुणालाही दोघांवर संशय आला नाही. मात्र, दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं. तेच या घटनेने नवरीकडचे लोकही हैराण आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.