CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 10:15 IST2025-10-28T10:14:43+5:302025-10-28T10:15:48+5:30
दिल्ली विद्यापीठातील २० वर्षीय विद्यार्थिनीशी संबंधित अॅसिड हल्ला प्रकरणात नवनवीन ट्विस्ट येत आहेत.

फोटो - ndtv.in
दिल्ली विद्यापीठातील २० वर्षीय विद्यार्थिनीशी संबंधित अॅसिड हल्ला प्रकरणात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, पीडितेने मुख्य आरोपी म्हणून ज्याचं नाव सांगितलं तो घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थितच नव्हता. करोल बाग परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो तरुण बाईकवरून कामावर जाताना दिसतो. या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर दिल्लीपोलिसांनी त्याला क्लीन चिट दिली आहे.
उत्तर दिल्लीतील मुकुंदपूर भागात ही घटना घडली, जेव्हा २० वर्षीय दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे कॉलेजला जात होती. बाईकवरून आलेल्या तीन तरुणांनी तिच्यावर अॅसिड फेकलं, ज्यामुळे ती गंभीर भाजली. विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, जितेंद्रने त्याचे दोन मित्र इशान आणि अरमान यांच्यासह तिच्यावर हल्ला केला.
Delhi: A 20-year-old girl sustained acid burn injuries after being attacked by three men
— IANS (@ians_india) October 26, 2025
The victim says, "Today, when I was going to college, they threw acid on me... They had been following me for quite some time..." pic.twitter.com/Z3ZqTt39DB
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोल बागमधील सीसीटीव्ही फुटेज जितेंद्रच्या दाव्याला पुष्टी देतं की तो घटनेच्या वेळी कामासाठी करोल बागमध्ये जात होता. सध्या पोलीस इतर दोन आरोपींचा शोध घेत आहेत आणि प्रकरणाशी संबंधित उर्वरित पुरावे तपासले जात आहेत. याच दरम्यान पोलिसांनी अॅसिड हल्ल्यातील पीडितेचे वडील अकील यांना अटक केली. पीडितेच्या वडिलांनी अॅसिड हल्ल्यात जितेंद्रला अडकवण्यासाठी कट रचल्याचं कबुल केलं.
पीडितेच्या वडिलांनी मुलीचा पाठलाग करणाऱ्या जितेंद्रला अडकवण्यासाठी हा हल्ला केल्याचं कबुल केलं आहे. विद्यार्थिनीने स्वतःच अॅसिड आणलं होतं. अकीलने सांगितलं की, जितेंद्रची पत्नी त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा खटला दाखल करत होती, म्हणून त्याने त्याला अॅसिड हल्ल्याच्या प्रकरणात अडकवण्याचा निर्णय घेतला.