शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
4
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
5
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
6
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
7
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
8
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
9
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
10
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
11
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
12
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
13
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
14
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
15
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
16
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
17
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
18
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
19
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...

विद्यार्थ्यांकडून लाच स्वीकारणारा मुख्याध्यापकासह शिक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 20:15 IST

१० हजाराची लाच : तुमसर तालुक्याच्या लोहारा येथे कारवाई

ठळक मुद्देमुख्याध्यापक शिवनाराण राणे यांनी १७ नंबरचा फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रूपये असे दहा हजार रूपये लाचेची मागणी केली.शिवनारायण राणे व बाबुलाल पटेल यांच्याविरूद्ध आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली शुक्रवारी रतिराम टेंभरे कनिष्ठ महाविद्यालयात सापळा रचण्यात आला.

भंडारा -  बारावीची परीक्षेचा १७ नंबरचा फॉर्म भरण्यासाठी दोन विद्यार्थ्यांकडून दहा हजार रूपयांची लाच घेताना तुमसर तालुक्यातील लोहारा येथील रतीराम टेंभरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकासह शिक्षकाला शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केली. यामुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.मुख्याध्यापक शिवनारायण जयराम राणे (५४) आणि सहाय्यक शिक्षक बाबुलाल मोतीराम पटले असे लाचखोर शिक्षकांची नावे आहे. ते दोघेही लोहारी येथील रतीराम टेंभरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहेत. सदर तक्रारदार हा लोहार येथीलच रहिवासी आहे. तक्रारदार आणि त्याच्या मित्राने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु काही कारणांनी ११ वीमध्ये प्रवेश घेतला नाही. त्यामुळे १७ नंबरचा फॉर्म भरून बारावीची परीक्षा देण्यासाठी ते रतीराम टेंभरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना भेटले. त्यावेळी मुख्याध्यापक शिवनाराण राणे यांनी १७ नंबरचा फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रूपये असे दहा हजार रूपये लाचेची मागणी केली.यावरून भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करण्यात आली. पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी या तक्रारीची गोपनीयरित्या शहनिशा केली. त्यानंतर शुक्रवारी रतिराम टेंभरे कनिष्ठ महाविद्यालयात सापळा रचण्यात आला. दोन विद्यार्थ्यांकडून दहा हजार रूपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.शिवनारायण राणे व बाबुलाल पटेल यांच्याविरूद्ध आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडेकर, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुध्दलवार यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक महेश चाटे, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, अश्विन गोस्वामी, पराग राऊत यांनी केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटकTeacherशिक्षकStudentविद्यार्थी