Video - भयंकर! २३ सेकंदात १० वेळा सपासप वार; भररस्त्यात सख्ख्या भाच्याने मामाला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:17 IST2026-02-12T14:16:39+5:302026-02-12T14:17:54+5:30

एका भाच्याने आपल्याच मामाला मारलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाच्याने हे कृत्य भररस्त्यात लोकांसमोर केलं.

nephew killed maternal uncle stabbed 23 times in second by knife in patna city | Video - भयंकर! २३ सेकंदात १० वेळा सपासप वार; भररस्त्यात सख्ख्या भाच्याने मामाला संपवलं

फोटो - nbt

बिहारची राजधानी पाटणा येथे एका भाच्याने आपल्याच मामाला मारलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाच्याने हे कृत्य भररस्त्यात लोकांसमोर केलं. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये एक तरुण आपल्या वृद्ध मामावर चाकूने सपासप वार करताना स्पष्टपणे दिसत आहे. १२ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

६२ वर्षांचा व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला आहे, तर हल्ला करणारा भाचा २६ वर्षांचा आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, सुरुवातीला आरोपी आपल्या मामासोबत रस्त्यावरून अगदी आरामात चालत आहे. तो काही क्षणात इतका भीषण हल्ला करेल, याचा अंदाज कोणालाही येत नाही. व्हिडिओमध्ये सुमारे १० सेकंद तो मामासोबत चालताना दिसतो, तोपर्यंत मामाला आपल्यावर येणाऱ्या संकटाची पुसटशी कल्पनाही नसते.

अचानक आरोपी आपल्या मामाच्या मानेवर चाकूने पहिला वार करतो. त्यानंतर पुढच्या अवघ्या २३ सेकंदात तो चाकूने एकामागून एक तब्बल १० वार करतो. वृद्ध मामा जमिनीवर कोसळतो, पण नराधम भाचा वार करणं थांबवत नाही. आपलं काम झालं आहे असे वाटल्यावर तो शांतपणे मागे फिरतो, आपले केस व्यवस्थित सेट करतो आणि आरामात चालत तिथून निघून जातो.

बिहारमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने (RJD) आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) हँडलवर या थरारक घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना नितीश कुमार सरकारवर कडाडून टीका केली आहे. "हाच का नितीश कुमार यांच्या समर्थकांच्या स्वप्नातील बिहार? दररोज गावात हत्या आणि शहरांमध्ये बलात्कार होत आहेत. बिहार पोलीस सुस्त आहेत आणि भाजपा-नितीश सरकार भ्रष्ट आणि बेफिकीर आहे. पाटण्यात दिवसाढवळ्या हत्या होत आहेत. गुन्हेगाराला कायद्याची आणि पोलिसांची भीती उरलेली नाही, त्याला पळून जाण्याचीही घाई नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

Web Title : बिहार: भांजे ने दिनदहाड़े मामा की बेरहमी से हत्या की, वीडियो हुआ वायरल

Web Summary : पटना में एक भांजे ने अपने मामा को सरेआम चाकू से गोदकर मार डाला। 26 वर्षीय हमलावर बेरहमी से हमला करने के बाद शांति से चला गया। चौंकाने वाले सीसीटीवी फुटेज ने बिहार सरकार की कानून व्यवस्था की स्थिति पर आक्रोश और आलोचना को जन्म दिया।

Web Title : Bihar: Nephew Brutally Murders Uncle in Broad Daylight, Shocking Video Surfaces

Web Summary : In Patna, a nephew fatally stabbed his uncle in public. The 26-year-old attacker calmly walked away after the brutal assault. The shocking CCTV footage sparked outrage and criticism of the Bihar government's law and order situation.