नोकरीच्या नावाखाली शेजारणीने विकले, अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 08:50 PM2022-03-16T20:50:01+5:302022-03-16T20:50:31+5:30

Rape case : याप्रकरणी मालवीय नगर पोलीस ठाण्यात पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडितेचे मेडिकल केले आहे.

Neighbors sold under the guise of a job, raped a minor girl several times | नोकरीच्या नावाखाली शेजारणीने विकले, अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा केला बलात्कार

नोकरीच्या नावाखाली शेजारणीने विकले, अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा केला बलात्कार

Next

दिल्लीतील मालवीय नगर भागात पश्चिम बंगालमधील एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. नोकरी लावण्याच्या नावाखाली काही लोकांनी अल्पवयीन मुलाला दिल्लीत आणल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी मालवीय नगर पोलीस ठाण्यात पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडितेचे मेडिकल केले आहे.

ही अल्पवयीन तरुणी मूळची सिलीगुडीची आहे. पीडितेने आपल्या जबाबात पोलिसांना सांगितले की, तिच्या शेजारच्या वहिनीने तिला तिची मैत्रिण ममताला भेटायला लावले. जिने तिला तीन वर्षांपूर्वी काम मिळवून देण्याचे सांगून दिल्लीत आणले होते. यानंतर ममता तिला घेऊन पंचशील विहार येथील मैत्रिण रीनाच्या घरी गेली आणि काही दिवस ती तिथेच राहिली.

ममता आणि रीना यांनी नोकरीच्या नावाखाली पीडितेला विकल्याचा आरोप पीडितेने केला आहे. इतकेच नाही तर दिल्लीतील अनेक भागात पीडितेसोबत बलात्काराच्या घटना घडल्या आणि पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. अल्पवयीन रुग्णालयात पोहोचल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. त्याचवेळी याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.

Web Title: Neighbors sold under the guise of a job, raped a minor girl several times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.