शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

थर्टी फर्स्टसाठी रेव्ह पार्टीची तयारी एनसीबीने उधळली, आयोजकास अटक तर चरस-गांजा जप्त 

By पूनम अपराज | Published: December 30, 2020 3:10 PM

Drug Case : एनसीबीच्या पथकाने अशरफ मुस्तफाची काटेकोरपणे चौकशी केली, नंतर ठाणे पश्चिमेस या व्यतिरिक्त पथकाने एका व्यक्तीच्या घराची झडती घेतली आणि येथून 11 किलो गांजा सापडला.

ठळक मुद्देअशरफ मुस्तफा शहा असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तो वागळे स्ट्रीट येथे राहतो. 

नवीन वर्षानिमित्त रेव्ह पार्टीची तयारी करत असलेल्या इव्हेंट आयोजकांना नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली आहे. एनसीबीने या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात चरस व गांजा हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. अशरफ मुस्तफा शहा असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तो वागळे स्ट्रीट येथे राहतो. 

नवीन वर्षापूर्वी आरोपी आयोजक  रेव्ह पार्टी आयोजित करणार असल्याची माहिती एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना मिळाली होती, रेव्ह पार्टीसाठी आयोजकाने मोठ्या प्रमाणात ड्रग्जची व्यवस्था केली होती. या माहितीच्या आधारे नारकोटिक्स ब्युरोने ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील मुलुंड चेक नाकाजवळ सापळा रचला आणि आयोजकास अटक केली. अशरफ मुस्तफा शहा असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. गुप्तचर सूत्रांनी या व्यक्तीची एनसीबीला माहिती दिली त्याआधारे ही अटक करण्यात आले आहे. एनसीबीच्या पथकाने या शाहची अंगझडती घेतली आणि घटनास्थळाचा शोध घेतला असता जवळच 4 किलो चरस सापडला.एनसीबीच्या पथकाने अशरफ मुस्तफाची काटेकोरपणे चौकशी केली, नंतर ठाणे पश्चिमेस या व्यतिरिक्त पथकाने एका व्यक्तीच्या घराची झडती घेतली आणि येथून 11 किलो गांजा सापडला. एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, अशरफ मुस्तफा शहा थर्टी फर्स्टसाठी रेव्ह पार्टी आयोजित करणार होता आणि या पार्टीमध्ये तो या ड्रग्जची विक्री करणार होता. तपासणी दरम्यान, हे स्पष्ट झाले आहे की, बर्‍याच तरुणांनी या पार्टीसाठी बुकिंग केले होते. शाहने जम्मू-काश्मीरमधून ड्रग्स मागवले असल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे.

आता एनसीबी अशरफ मुस्तफा शाह याच्या संपर्कात अजून कोणी आहे का ? याच्याकडून ते ड्रग्स खरेदी करत असतील का? याखेरीज एनसीबी ज्या लोकांकडे तो मुंबईत अमली पदार्थांची विक्री केली त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :ArrestअटकDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोthaneठाणेNew Yearनववर्ष