शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नवाब मलिकांचा खळबळजनक खुलासा; हसीना पारकरचा बॉडीगार्ड, चालक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 13:39 IST

Nawab Malik's sensational revelation : ईडीच्या चौकशीदरम्यान नवाब मलिक यांनी एक एक खळबळजनक माहिती त्यांनी दिलेल्या जबाबातून उघड झाली आहे.

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहात आहेत. गोवावाला कम्पाउंड खरेदी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. कुर्ला येथील गोवावाला कम्पाउंडची जागा बळकविण्यासाठी ‘डी गँग’ सदस्यांसोबत आर्थिक गैरव्यवहार व  गुन्हेगारी कट रचण्यात मंत्री नवाब मलिक यांचा थेट व जाणूनबुजून सहभाग होता, हे दर्शविणारे प्रथमदर्शनी पुरावे आहेत, असे ईडीने मलिक यांच्यावर दाखल केलेल्या आरोपपत्रांची दखल घेताना विशेष पीएमएलए न्यायालयाने सांगितले. गेल्या महिन्यात ईडीने मलिक यांच्यावर पाच हजार पानी आरोपपत्र दाखल केले. त्याचे वाचन केल्यावर विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. राहुल रोकडे यांनी म्हटले की, तक्रारीमध्ये आरोपीवर करण्यात आलेले आरोप आणि रेकॉर्डवर सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता या प्रकरणावर पुढील कार्यवाही करण्यास पुरेशी कारणे आहेत.

तसेच ईडीच्या चौकशीदरम्यान नवाब मलिक यांनी एक एक खळबळजनक माहिती त्यांनी दिलेल्या जबाबातून उघड झाली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकरचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर म्हणून काम पाहणारा सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता, असा जबाब मलिक यांनी ईडीला दिल्याची माहिती समोर आली आहे. २००२ सालापासून मी सलीम पटेलला ओळखत होतो. तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करत होता, अशी नवाब मलिक यांनी ईडीला दिलेल्या जबाबात नमूद असल्याची माहिती  टीव्ही 9 ने दिली आहे. फरार गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीतील इतर सदस्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नवनवीन आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे. दाऊद आपला भाऊ इक्बाल कासकरसह त्याच्या भावंडांना आणि नातेवाइकांना दर महिन्याला १० लाख रुपये पाठवत असल्याची माहिती ईडीला समजली आहे. इक्बाल कासकरलाही ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

इक्बाल कासकरच्या बालपणीच्या मित्राचा धाकटा भाऊ खालिद उस्मान शेख याने ही माहिती दिली आहे. ईडीला दिलेल्या जबाबात खालिद उस्मान म्हणाला की, माझा भाऊ अब्दुल समद आणि इक्बाल कासकर हे बालपणीचे मित्र होते आणि त्यांनी बराच काळ एकत्र घालवला आहे. अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिम टोळी यांच्यात झालेल्या टोळीयुद्धात ७ डिसेंबर १९९० रोजी माझा भाऊ मारला गेला, असे खालिद म्हणाला. जेव्हा माझा मोठा भाऊ मारला गेला तेव्हा इक्बाल दुबईत होता आणि तो भारतात परतला तेव्हा तो माझ्या आईला भेटायला आला होता.

 

सलीम अहमद सय्यद उर्फ सलीम पटेल हा त्याला त्याच्या नावाने ओळखत असल्याचा खुलासाही खालिद उस्मानने केला आहे. तो म्हणाला की, पटेल त्याच शेजारी राहत होता आणि मृत सलीम पटेल आणि खालिद दाऊद इब्राहिम आणि इक्बाल कासकरची बहीण हसीना पारकर जिचा मृत्यू झाला आहे, त्यांच्यासाठी सलीम ड्रायव्हर म्हणून काम करत असे.

सलीम पटेल हा हसिना पारकर हिच्यासाठी जमीन हडप करून मालमत्तेचे वाद मिटवत असे. हसीना पारकरने दाऊद इब्राहिमच्या नावाचा भरपूर वापर करून पैसे कमवले. खालिदने पुढे सांगितले की, मुंबईतील वांद्रे येथील असाच एक फ्लॅट सलीम पटेल आणि हसिना पारकर यांनी जबरदस्तीने ताब्यात घेतला होता.

 

 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDawood Ibrahimदाऊद इब्राहिमEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस