नवी मुंबई हादरली! पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पतीने एकाला संपवले; मृतदेह १९१ किमी दूर घेऊन गेला अन्.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:37 IST2026-02-11T13:32:22+5:302026-02-11T13:37:16+5:30

पोलिसांनी पकडू नये म्हणून आरोपीने मृतदेह कारच्या पुढच्या सीटवर एखाद्या जिवंत माणसासारखा बसवला आणि स्वतः कार चालवत १९१ किलोमीटरचा प्रवास केला.

Navi Mumbai shocked! Husband kills one on suspicion of having an affair with his wife; takes body 191 km away and.. | नवी मुंबई हादरली! पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पतीने एकाला संपवले; मृतदेह १९१ किमी दूर घेऊन गेला अन्.. 

AI Generated Image

नवी मुंबई पोलीस दलातील एका हवालदाराने आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाची निर्घृण हत्या केली. एवढेच नाही, तर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह १९१ किलोमीटर लांब नेऊन एका विहिरीत फेकून दिला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड गावात हा प्रकार उघडकीस आला असून या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

विहिरीत आढळला जळालेला मृतदेह

खंडाळा तालुक्यातील सुखेड येथील एका शेतातील विहिरीत एका पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. लोणंद पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासात हा मृतदेह सोमनाथ बोबडे या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले. अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आणि तपासाचे धागेदोरे थेट नवी मुंबई पोलीस दलापर्यंत पोहोचले.

संशयाचं भूत अन् हत्येचा कट

या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू भिसे हा नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे. भिसे हा कळंबोलीतील रोडपाली परिसरात राहतो. सोमनाथ बोबडे हा त्याच्या परिचयाचा होता, मात्र सोमनाथचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय भिसेला होता. याच संशयातून त्याने सोमनाथचा काटा काढण्याचे ठरवले. ५ फेब्रुवारी रोजी भिसे याने आपल्या विजय पवार, किरण गायकवाड आणि श्रीनिवास लोणे या मित्रांच्या मदतीने सोमनाथला एका बहाण्याने बोलावून घेतले आणि सर्वांनी मिळून त्याचा गळा दाबून खून केला.

पुढच्या सीटवर बसवला मृतदेह अन्... 

हत्येनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अतिशय थरारक पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलिसांनी पकडू नये म्हणून त्याने सोमनाथचा मृतदेह कारच्या पुढच्या सीटवर एखाद्या जिवंत माणसासारखा बसवला आणि स्वतः कार चालवत १९१ किलोमीटरचा प्रवास केला. सुखेड गाठल्यानंतर त्याने मृतदेह एका विहिरीत टाकला आणि ओळख पटू नये म्हणून तो जाळण्याचा प्रयत्न केला.

सीसीटीव्ही आणि कारने उघडले गुपित

लोणंद पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पुण्याच्या दिशेने जाणारी एक संशयास्पद कार आढळून आली. या कारचा माग काढत पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. हवालदार बंडू भिसे याने अटक झाल्यानंतरही गुन्हा कबूल करण्यास टाळाटाळ केली, मात्र त्याच्या साथीदारांनी पोलिसांसमोर पोपटासारखे सर्व सत्य सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : नवी मुंबई: प्रेम संबंध के शक में पुलिसकर्मी ने की हत्या, शव दूर फेंका

Web Summary : नवी मुंबई में एक पुलिस कांस्टेबल ने अपनी पत्नी के साथ प्रेम संबंध के संदेह में एक व्यक्ति की हत्या कर दी। उसने दोस्तों की मदद से शव को 191 किलोमीटर दूर सतारा जिले में एक कुएं में फेंक दिया। पुलिस जांच में अपराध का खुलासा हुआ।

Web Title : Navi Mumbai cop kills man over affair suspicion, disposes body far away.

Web Summary : A Navi Mumbai police constable murdered a man suspected of having an affair with his wife. He disposed of the body 191 km away in a well in Satara district, with the help of his friends. Police investigation revealed the crime.