नाशिकच्या प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.प्राची पवार यांच्यावर फार्म हाऊस बाहेर धारधार शस्त्राने हल्ला

By अझहर शेख | Updated: December 13, 2022 23:32 IST2022-12-13T23:32:19+5:302022-12-13T23:32:53+5:30

गोवर्धन शिवारातील पवार यांच्या फार्म हाऊसमध्ये रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास तिघा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला.

Nashik's famous ophthalmologist Dr. Prachi Pawar was attacked with a sharp weapon outside his farm house | नाशिकच्या प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.प्राची पवार यांच्यावर फार्म हाऊस बाहेर धारधार शस्त्राने हल्ला

नाशिकच्या प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.प्राची पवार यांच्यावर फार्म हाऊस बाहेर धारधार शस्त्राने हल्ला

नाशिक: तालुक्यातील गंगापूर गावाच्या पुढे गोवर्धन शिवारात मंगळवारी (दि.13) संध्याकाळी साडे आठ वाजजाच्या सुमारास डॉ.प्राची पवार यांच्यावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात प्राची पवार जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर पंडित कॉलनीमधील त्यांच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

गोवर्धन शिवारातील पवार यांच्या फार्म हाऊसमध्ये रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास तिघा अज्ञात हल्लेखोरांनी शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात शस्त्राचा वार त्यांच्या खांद्यावर लागला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. जखमी अवस्थेतच घटनेची माहिती पवार यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. तातडीने पवार यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते. हल्लेखोरांपैकी दोघे जण हे झाडाझुडुपांमध्ये लपलेले होते. त्यांनी दुचाकी पवार फार्म हाऊसच्या रस्त्यावर उभी केल्याने प्राची पवार यांनी हटकले असता हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या शस्त्रांनी त्यांच्यावर वार करून दुचाकीने धूम ठोकली. याबाबत तालुका पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
 

Web Title: Nashik's famous ophthalmologist Dr. Prachi Pawar was attacked with a sharp weapon outside his farm house