नाशिक : हॉटेलमध्ये भेटायला बोलावून पतीनं पत्नीचा गळा दाबून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 06:56 IST2021-09-29T06:56:16+5:302021-09-29T06:56:43+5:30

आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

Nashik:Husband strangled his wife to death after inviting her to meet him at a hotel | नाशिक : हॉटेलमध्ये भेटायला बोलावून पतीनं पत्नीचा गळा दाबून केला खून

नाशिक : हॉटेलमध्ये भेटायला बोलावून पतीनं पत्नीचा गळा दाबून केला खून

ठळक मुद्देआरोपी पोलिसांच्या ताब्यात.

नाशिकरोड येथील हॉटेल मध्ये पतीने पत्नीला भेटायला बोलावून गळा दाबून खून घटना घडली असून नाशिकरोडपोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. पत्नीचा खून केल्यानंतर हॉटेल मधून बाहेर पडणाऱ्या पतीला नाशिकरोड पोलिसांनी बिटको पॉईंट परिसरातून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे सासरी राहणाऱ्या ज्योती पोपट वीर व पती पोपट वीर यांच्यात वाद सुरू होता. त्या कारणावरुन ज्योती या जेलरोड भागातील त्यांच्या माहेरी काही दिवसांपूर्वी आलेल्या होत्या. पती पोपट याने पत्नी ज्योतीला मंगळवारी (दि.२८) सायंकाळी नाशिकरोडच्या बिटको पॉईंट येथील पवन हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. या ठिकाणी दोघांमध्ये पुन्हा खटके उडाल्याने रुममध्येच पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर महिलेचा पती संशयित पोपट हा फरार होण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. 

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयित पोपटला ताब्यात घेतले. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक  गणेश न्याहळदे, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Web Title: Nashik:Husband strangled his wife to death after inviting her to meet him at a hotel