नालासोपारा घातपात कटप्रकरणाची व्याप्ती वाढली; राज्यभरातून 12 जणांची धरपकड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 12:35 PM2018-08-11T12:35:02+5:302018-08-11T14:08:25+5:30

मुंबईसह नालासोपारा, पुणे, सातारा, सोलापूरमध्ये धरपकड सुरु; सनातनच्या वकिलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Nalasopara vaibhav raut bomb case coverage increased; 12 people from across the state | नालासोपारा घातपात कटप्रकरणाची व्याप्ती वाढली; राज्यभरातून 12 जणांची धरपकड

नालासोपारा घातपात कटप्रकरणाची व्याप्ती वाढली; राज्यभरातून 12 जणांची धरपकड

Next

मुंबई/नालासोपारा : हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित वैभव राऊत कडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातून काल संध्याकाळी दोघांना अटक केली होती. या प्रकरणाची व्याप्ती आज वाढली असून सकाळी केलेल्या कारवाईत पुण्यातून आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर राज्यभरातून एकूण 12 जणांना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस)ही कारवाई करत, राज्यात सणासुदीच्या दिवसात घातपात घडवून आणण्याचा मोठा कट उधळून लावला. कालच्या कारवाईमध्ये वैभव राऊत, शरद कळसकर व सुधन्वा गोंधळेकर या हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. 


 संशयित आरोपी मुंबईसह नालासोपारा, पुणे, सातारा, सोलापूर या ठिकाणी बॉम्बस्फोट किंवा घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत होते, अशी शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे. या जिल्हांमध्ये आज कारवाई करण्यात आली. यामध्ये 12 जणांना चौैकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. 

न्यायालयाने राऊतसह तिघांना १८ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडीत पाठविले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भातही या तिघांची चौकशी होणार आहे.

कसा आला संशय?
सनातनच्या पनवेलजवळच्या आश्रमावर गुप्तचरांची पाळत होती. तेथे कोण येते, किती वेळ थांबते, सोबत येताना कोण येते, जाताना कोणासोबत जाते, कोण थांबते, किती वेळ थांबते याची माहिती घेताघेता वैभव राऊतचा सनातनच्या या आश्रमातील वावर ठळकपणे लक्षात आला. त्यातूनच पुढे त्याच्या बंगल्यावर पाळत ठेवण्यात आली. तेव्हा रात्रीच्या वेळी अनेक व्यक्ती त्याच्या बंगल्यावर येतात. बराच वेळ थांबतात आणि मध्यरात्री किंवा पहाटे बाहेर पडतात, असे आढळून आले. त्यामुळे त्याच्यावरील संशय वाढत गेला. त्यातूनच त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला.

 

सनातनच्या वकिलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभव राऊत सह इतरांच्या झालेल्या अटकेप्रकरणी एटीएसवर गंभीर आरोप केले आहेत. यासंबंधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिवले आहे. या पत्रात एटीएस या युवकांचा छळ करत आहे. मालेगाव सारखा प्रकार या युवकांच्या बाबतीत होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Nalasopara vaibhav raut bomb case coverage increased; 12 people from across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.