चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 09:05 IST2025-04-20T09:03:57+5:302025-04-20T09:05:02+5:30
Crime news: दोघांचेही कपडे काढून टाकण्यात आले, त्यांना विजेचे झटके देण्यात आले आणि त्यांची नखे उपटण्यात आली.

चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
कोरबा (छत्तीसगड) : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात चोरीच्या संशयावरून एका आइस्क्रीम कारखान्यातील दोन कामगारांवर त्यांच्या मालकाने आणि त्याच्या सहकाऱ्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी कामगारांचे नखे उपटली आणि त्यांना विजेचे झटके दिले.
राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील रहिवासी अभिषेक भांभी आणि विनोद भांभी यांना सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील खाप्रबत्ती भागात छोटू गुर्जरच्या आइस्क्रीम कारखान्यात काम करण्यासाठी एका कंत्राटदाराने कामावर ठेवले होते.
१४ एप्रिल रोजी गुर्जर आणि त्याचा सहकारी मुकेश शर्मा यांनी दोन्ही कामगारांवर चोरीचा आरोप केला. त्यानंतर दोघांचेही कपडे काढून टाकण्यात आले, त्यांना विजेचे झटके देण्यात आले आणि त्यांची नखे उपटण्यात आली.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. घटनेनंतर दोन्ही पीडित तेथून पळून गेले आणि भिलवाडा येथील त्यांच्या मूळ गावी पोहोचले. त्यांनी भिलवाडा येथील गुलाबपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राजस्थान पोलिसांनी 'शून्य' एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
मालकाला आला राग
पीडितांपैकी एकाने सांगितले की, त्यांनी त्यांच्या मालकाकडे वाहनाचा हप्ता भरण्यासाठी २०,००० रुपये आगाऊ मागितले होते. मालकाने नकार दिला तेव्हा त्यांनी नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केली. मालकाला याचा राग आल्याने त्यांने अत्याचार केले.