शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन
3
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
4
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
5
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
6
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
7
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
8
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
9
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
10
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
11
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
12
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
13
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
14
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
15
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
16
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
17
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
18
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
19
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
20
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर शिक्षिकेच्या हत्येचे गूढ उकललं, टी-शर्टच्या प्रिंटवरून उघडकीस आला मारेकरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 17:00 IST

Pregnent Teacher Murder Case : शिक्षिकेची हत्या तिच्या अल्पवयीन प्रियकराने केल्याचे पोलिसांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील अयोध्येतील ५ महिन्यांच्या गरोदर शिक्षिकेच्या खून प्रकरणाची उकल तब्बल महिनाभरानंतर पोलिसांनी केली आहे. हे प्रकरण श्रीरामपूर कॉलनीचे आहे. शिक्षिकेची हत्या तिच्या अल्पवयीन प्रियकराने केल्याचे पोलिसांनी सांगितले. एका ३५ वर्षीय शिक्षकाचे १७ वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुलाला तिच्यासोबतचे नाते संपवायचे होते. मात्र, शिक्षकाला हे मान्य नव्हते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका अल्पवयीन प्रियकरावर संबंध तोडू नये म्हणून दबाव टाकत होती. यामुळे रागाच्या भरात अल्पवयीन प्रियकराने त्याला जीवे मारण्याचा कट रचला. १ जून रोजी महिला शिक्षिका घरी एकटी असताना तिला भेटण्याच्या बहाण्याने तो तेथे गेला. महिला शिक्षिकेच्या घरात घुसताच त्याने तिच्यावर चाकूने वार केले. यात महिला शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. महिलेवर चाकूने 24 वार करण्यात आले.टी-शर्ट प्रिंटने तपासाचा वेग वाढलाखून प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी यासाठी एक पथक तयार केले. तपासादरम्यान पोलिसांना घरात बसवलेले सीसीटीव्ही फुटेज सापडले, मात्र त्यामध्ये मुलाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पोलिसांनी तपासाचा आधार घेत मुलाच्या टी-शर्टची प्रिंट घेतली आणि ऑनलाइन साइट्सपासून ते रेडिमेड स्टोअरपर्यंत कोणत्या ग्राहकाने अशा पॅटर्नचा टी-शर्ट खरेदी केला आहे, याची माहिती घेतली.महिला शिक्षिकेच्या घरी टी-शर्टची डिलिव्हरी झालीदरम्यान, २ महिन्यांपूर्वी फ्लिपकार्टवरून एका महिला शिक्षिकेच्या घरी अशा प्रकारचा टी-शर्ट डिलिव्हरी झाल्याचे कळले. पोलिसांसाठी हे पहिले मोठे यश होते. याद्वारे पोलिसांना बरेच पुरावे मिळाले आणि ते अल्पवयीन आरोपींपर्यंत पोहोचले. अल्पवयीन आरोपीला टी-शर्टबाबत विचारणा करण्यात आली. तो टी-शर्ट त्याने पोलिसांना दिला. पोलिसांनी टीशर्ट फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले असता, त्यात रक्ताचे डाग दिसले.'महिला शिक्षिका बदनामीची धमकी द्यायची'त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची कडक चौकशी केली, त्यानंतर त्याने हत्येचा आरोप कबुल केला. आरोपी अल्पवयीन मुलीने आपले महिला शिक्षिकेसोबत अवैध संबंध असल्याचे सांगितले. त्याला हे नाते संपवायचे होते. मात्र, महिला शिक्षिका मान्य करत नव्हती. नंतर तिने त्याला बदनाम करण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अल्पवयीन मुलाने महिला शिक्षिकेची चाकूने निर्घृण हत्या केली.अयोध्येचे डीआयजी एपी सिंह यांनी सांगितले की, अल्पवयीन आरोपी हा १२ वीचा विद्यार्थी आहे. गुणपत्रिकेनुसार त्याचे वय साडेसतरा वर्षे आहे. मात्र, तो त्याच्या वयापेक्षा खूपच मोठा दिसतो. त्याचे मेडिकल करण्यात आले आहे. तो प्रौढ की अल्पवयीन हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशpregnant womanगर्भवती महिलाTeacherशिक्षक