सुटकेसमध्ये सापडलेल्या मानवी शरीराच्या अवयवांचे गूढ अखेर उलगडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 16:16 IST2019-12-07T16:14:54+5:302019-12-07T16:16:38+5:30
या प्रकरणी दत्तक मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

सुटकेसमध्ये सापडलेल्या मानवी शरीराच्या अवयवांचे गूढ अखेर उलगडले
मुंबई - संपत्तीसाठी दत्तक घेतलेल्या मुलीनेच रचला अल्पवयीन प्रियकरासोबत हत्येचा कट रचला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. त्यामुळे माहीम दर्ग्याच्या मागे असलेल्या समुद्रकिनारी एका सुटकेसमध्ये सापडलेल्या मानवी अवयवांचे गूढ उकलले असून हे अवयव सांताक्रूझ येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय बेनेट यांचे असल्याचे तपासात उघड झाले आहे. बॅनोटो यांची हत्या संपत्तीच्या वादातून करण्यात आली असून गुन्हे शाखेने या प्रकरणी दत्तक मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
फेसबुकवरील 'तो' फोटो अन् टेलरच्या माहितीवरून पोलिसांनी केला हत्येचा उलगडा
मुंबई - दत्तक घेतलेल्या मुलीनेच रचला अल्पवयीन प्रियकरासोबत हत्येचा कट, माहिममध्ये सुटकेसमध्ये सापडलेल्या अवयवांचे गूढ उकलले https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) December 7, 2019
पंचतारांकित हॉटेलमध्ये म्युझिक शो करणारे बॅनोटो हे सांताक्रूझ पूर्व येथील वाकोला मस्जिद येथे एकटेच राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी एका तरुणीला दत्तक घेतले. या तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. बेनेट यांची संपत्ती आपल्याला मिळावी म्हणून दत्तक घेतलेल्या तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने बेनेट यांची राहत्या घरातच हत्या केली. त्यानंतर बेनेट यांच्या शरीराचे तुकडे करून ते भाग वेगवेगळ्या सुटकेसमध्ये भरून तिन्ही सुटकेस वाकोला येथून वाहत जाणाऱ्या मिठी नदीत फेकून दिल्या. त्यातील एक सुटकेस माहीम पोलिसांना सोमवारी माहीम दर्ग्याच्या मागे असलेल्या समुद्रात मिळाली होती. त्या सुटकेसमध्ये एक हात, एक पाय आणि पुरुषाचे गुप्तांगांचा कापलेला भाग होता. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.