काळ्या बॅगेतील मृतदेहाचे गूढ उकलले; आरोपीला यूपीतून केले जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 19:44 IST2020-01-02T19:40:26+5:302020-01-02T19:44:16+5:30

विवाहबाह्य संबधातून ही हत्या करण्यात झाली असल्याचे सिद्ध झाले आहे.

The mystery of the dead body in the black bag found; The accused is arrested from UP | काळ्या बॅगेतील मृतदेहाचे गूढ उकलले; आरोपीला यूपीतून केले जेरबंद 

काळ्या बॅगेतील मृतदेहाचे गूढ उकलले; आरोपीला यूपीतून केले जेरबंद 

ठळक मुद्दे हत्येप्रकरणी उत्तर परदेशातून लालता प्रसाद (41) या आरोपीला अटक केली आहे.9 डिसेंबर रोजी इमरानच्या हत्येची माहिती पोलिसांना मिळाली होती. लग्नांनंतर इमरानने संध्याला त्रास देण्यास सुरुवात केला.

पनवेलपनवेलमध्ये 20 दिवसांपूर्वी झालेल्या अनोळखी इसमाच्या हत्येप्रकरणी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.मृत्युमुखी पावलेल्या व्यक्तीचे नाव इमरान असून त्याच्या हत्येप्रकरणी उत्तर परदेशातून लालता प्रसाद (41) या आरोपीला अटक केली आहे.

विवाहबाह्य संबधातून ही हत्या करण्यात झाली असल्याचे सिद्ध झाले आहे. 9 डिसेंबर रोजी इमरानच्या हत्येची माहिती पोलिसांना मिळाली होती. यासंदर्भात अधिक तपास केले असता आरोपी लालता यादव याची पत्नी संध्या सोबत मयत इमरान चे अनैतिक संबध होते. इमरानने संध्या सोबत पळून लग्न केले होते. लग्नांनंतर इमरानने संध्याला त्रास देण्यास सुरुवात केला. यावेळी संध्याने ही बाब आपला पती लालता यादवला सांगितल्यावर चालता यादवने पनवेल गाठून शिथाफीने इमरानचा खून केला.याप्रकरणी आरोपी लालता यादवने स्वतः पोलिसाना या घटनाक्रमाचा माहिती दिली. यासंदर्भात लवकरच पोलीस पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत .

Web Title: The mystery of the dead body in the black bag found; The accused is arrested from UP