मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 08:25 IST2025-04-30T08:22:27+5:302025-04-30T08:25:19+5:30
Mysuru tech entrepreneur Harshavardhana S Kikkeri News: रोबोटिक्स तज्ज्ञ असलेल्या भारतीय उद्योजकाने अमेरिकेत आपलं कुटुंबच संपवलं. घटना घडली त्यावेळी छोटा मुलगा घरी नव्हता. त्यामुळे तो वाचला.

मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
भारतीय तंत्रज्ञ आणि उद्योजक हर्षवर्धन एस. किक्केरी यांनी आपली पत्नी आणि मुलाची गोळ्या घालून हत्या केली. पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर हर्षवर्धन किक्केरी यांनी पोलिसांना कॉल करून माहिती दिली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या करून आयुष्य संपवले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकेतली वॉशिंग्टनमधील न्यूकॅसलमध्ये २४ एप्रिल रोजी ही घटना घडली. ज्यावेळी घटना घडली, त्यावेळी हर्षवर्धन किक्केरी यांचा छोटा मुलगा घरी नव्हता. त्यामुळे तो वाचला.
वाचा >>नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
पत्नी आणि मुलांसह न्यूकॅसलमध्ये वास्तव
मयत हर्षवर्धन एस किक्केरी (वय ५७) हे रोबोटिक्स कंपनी होलोवर्ल्डचे सीईओ होते. होलोवर्ल्डचे मुख्यालय मैसूरमधील विजयनगरमध्ये आहे. ते त्यांची पत्नी आणि होलोवर्ल्डच्या सहसंस्थापक श्वेता पन्याम (वय ४४) आणि दोन मुलांसह वॉशिंग्टन न्यूकॅसलमध्ये राहत होते.
घरात आढळले तीन मृतदेह
किंग काऊंटी शेरीफ पोलीस कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना आपतकालीन नंबरवर कॉल आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हर्षवर्धन यांच्या घरात तीन मृतदेह आढळून आले. पत्नी, मुलाची हत्या करून त्यांनी आत्महत्या का केली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
हर्षवर्धन यांनी पत्नी आणि १४ वर्षीय मुलाची गोळ्या घालून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. त्यांचा ७ वर्षाचा छोटा मुलगा घटना घडली त्यावेळी बाहेर होता. त्यामुळे तो घटनेतून वाचला.
भिंतीवर रक्ताचे डाग, घरात काडतुसे
पोलिसांनी घराची पाहणी केली. यावेळी घरातील समोरच्या खिडकीवर रक्ताचे डाग पडल्याचे आढळून आले. त्याचबरोबर घरात गोळीबार केल्यानंतरची रिकामे कारतूसही मिळाले आहे. सध्या या घटनेच्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.