शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडी सरकारविरुद्ध माझी लढाई अधिक जोमाने पुढे जाणार; किरीट सोमय्यांना अर्ध्या डझन नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 21:11 IST

Kirit Somaiya : आरोपांबाबत सोमय्या यांना शिवडी न्यायालयाने समन्स बजावले असून येत्या ५ ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. 

ठळक मुद्देभ्रष्ट महाआघाडी सरकार विरुद्ध माझी लढाई अधिक जोमाने पुढे जाणार असं ट्वीट भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. 

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्यात सत्तेवर असलेल्या महाआघाडी सरकारच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधत शिवसेना पक्षातील नेत्यांचं भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणले आहेत. अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतो म्हणून उद्धव ठाकरेंचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत', असा गंभीर आरोप केला होता. तसेच, कितीही गुंडांना बोलावले आणि दाऊदला आणले तरी आम्ही घाबरणारे नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. १०० कोटींचा खटल्यांचा अर्ध्या डझन नोटीस ठाकरे सरकारचा नेत्यांकडून मला  आतापर्यंत मिळाल्या आहेत. प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर, हसन मुश्रीफ, अनिल परब, जितेंद्र आव्हाड यांचे वाझे. त्यांनी माझी बायको आणि मुलाचीही चौकशी केली असून भ्रष्ट महाआघाडी सरकार विरुद्ध माझी लढाई अधिक जोमाने पुढे जाणार असं ट्वीट भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. 

माजी खासदार किरीट सोमय्यामागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी अर्थ या एनजीओवरदेखील गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. याच आरोपांबाबत सोमय्या यांना शिवडी न्यायालयाने समन्स बजावले असून येत्या ५ ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. 

तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून ४० CISF जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत. ही झेड दर्जाची सुरक्षा आहे. किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री, नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात मोहीम सुरु केल्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. या धमक्यानंतर किरीट सोमय्या यांनी केंद्राकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. सोमय्यांची मागणी तात्काळ मान्य करत त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली. आजपासून सोमय्यांभोवती केंद्राच्या जवानांचं सुरक्षेचं कवच आहे.  

 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitin Sardesaiनितीन सरदेसाईHasan Mushrifहसन मुश्रीफAnil Parabअनिल परब