प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 09:53 IST2025-10-14T09:51:40+5:302025-10-14T09:53:10+5:30
उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका लव्हस्टोरीचा भयंकर शेवट झाला आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका लव्हस्टोरीचा भयंकर शेवट झाला आहे. अलिगोल खिडकी परिसरातील रहिवासी असलेली २१ वर्षीय मेहक तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. मेहकने दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन विवेक अहिरवार या हिंदू तरुणाशी लग्न केलं होतं. तिच्या सासरचे लोक याला आत्महत्या म्हणत आहेत, तर तिचे पालक मेहकची हत्या झाल्याचा दावा करतात.
मेहकची आई गुडिया हिचा आरोप आहे की, जावई विवेक आणि त्याचं कुटुंब सतत मुलीचा छळ करत होतं आणि शेवटी तिची हत्या करत होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदन केले. विवेक अहिरवार हा त्यांच्या शेजाऱ्याच्या घरी वारंवार येत असे. तिथेच त्याची मेहकशी भेट होऊ लागली आणि त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली.
धर्म आणि समाजाकडे दुर्लक्ष करून दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. ७ मार्च २०२४ रोजी विवेक माझ्या मुलीसोबत पळून गेला. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, पण कोणतीही कारवाई झाली नाही. सुमारे दोन महिन्यांनंतर आम्हाला कळलं की त्यांनी लग्न केलं आहे आणि ते इम्लीपुरा परिसरात भाड्याच्या घरात राहत आहेत. लग्नानंतर काही महिने सर्व काही सुरळीत चाललं. पण नंतर विवेक तिच्याकडे पैसे मागायला सुरुवात केली.
जेव्हा मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तेव्हा मारहाण आणि मानसिक छळ करण्यात आला. मुलीने एकदा रेफ्रिजरेटर हवा आहे असं सांगितलं, म्हणून आम्ही कशी तरी पैशाची व्यवस्था केली आणि तिला घेऊन दिला. तरीही सासरचे समाधानी नव्हते. मेहक अनेक दिवस तिच्या आईवडिलांच्या घरी राहिली. याच दरम्यान विवेक आणि त्याच्या कुटुंबाने वारंवार माफी मागितली. आईला वाटलं की कदाचित आता सर्व काही ठीक होईल. म्हणून मुलीला तिच्या सासरच्या घरी परत पाठवण्यात आलं.
महकच्या आईने स्पष्ट केलं की, ९ ऑक्टोबर रोजी संपूर्ण कुटुंब कामासाठी इंदूरला गेलं होतं. रविवारी मेहकने गळफास घेतल्याची बातमी मिळाली. आम्ही लगेच झाशीला परतलो, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आम्ही पोहोचलो तोपर्यंत पोलिसांनी पंचनामा करून पोस्टमॉर्टम केलं होतं. आम्हाला सांगण्यात आलं की तिने आत्महत्या केली आहे, पण आमचा त्यावर विश्वास बसत नाही. विवेक आणि त्याच्या कुटुंबाने माझ्या मुलीची हत्या केली.