सौरभच्या हत्येप्रकरणी मेरठ जेलमध्ये असलेली मुस्कान रस्तोगी गर्भवती असल्याने तिला दुसऱ्या बॅरेकमध्ये हलवण्याची तयारी सुरू आहे. जेल नियमावलीतील तरतुदींनुसार, गर्भवती महिला कैद्यांना वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे मुस्कानला आता जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट मिळेल.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला कैदी संगीतालाही मुस्कानसोबत त्याच बॅरेकमध्ये ठेवण्यात येणार आहे. कारण अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्येही ती गर्भवती असल्याचं समोर आलं आहे. शनिवारी जेल प्रशासनाला दोघांचेही रिपोर्ट मिळाले. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, या कैद्यांना विशेष डाएट, आवश्यक औषधं आणि वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील.
वरिष्ठ जेल अधीक्षक डॉ. विरेशे राज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला कैद्यांना विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत. गर्भवती कैद्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी जेल प्रशासन घेत आहे.
मेरठमध्ये पतीची हत्या करणाऱ्या मुस्कानची शुक्रवारी प्रेग्नेन्सी टेस्ट करण्यात आल्याचं जेल अधीक्षकांनी सांगितलं. गर्भवती कैद्यांसाठी प्रोटोकॉलनुसार मुस्कानला वैद्यकीय सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तिची काळजी घेतली जाईल.
मुस्कानने तिचा बॉयफ्रेंड साहिलसोबत मिळून पती सौरभची हत्या केली होती. यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले, एका ड्रममध्ये ते तुकडे ठेवण्यात आले आणि सिमेंटने तो ड्रम सील करण्यात आला.या हत्येनंतर दोघेही हिमाचल प्रदेशला फिरायला गेले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.