तळेगावातील युवकाचा लोहगडाच्या पायथ्याशी धारदार शस्त्राने वार करुन खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 12:47 IST2018-11-17T12:45:47+5:302018-11-17T12:47:28+5:30

गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास युवक बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी तळेगाव पोलीस ठाण्यात दिली होती.

murder of youth by a weapon attack at lohgad area | तळेगावातील युवकाचा लोहगडाच्या पायथ्याशी धारदार शस्त्राने वार करुन खून 

तळेगावातील युवकाचा लोहगडाच्या पायथ्याशी धारदार शस्त्राने वार करुन खून 

ठळक मुद्देखुनामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट

लोणावळा : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील एका युवकाचा लोहगड किल्ला ते भाजे लेणी दरम्यान खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. धारदार शस्त्राने सदर युवकाच्या मान व पाठीवर वार करण्यात आले असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीसांनी दिली. 
   विनोद पवार (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे या मयत युवकाचे नाव आहे. गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास तो बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी तळेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. खुनामागील नेमके कारण अद्याप समजु शकलेले नाही. सदरचा मृतदेह हा शव विच्छेदनाकरिता पाठविण्यात आला असून लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले हे तपास करत आहेत.

Web Title: murder of youth by a weapon attack at lohgad area