बकरी चोरल्याच्या संशयावरून गावकऱ्यांकडून तरुणाची हत्या, झारखंडमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 14:35 IST2020-05-13T14:33:15+5:302020-05-13T14:35:36+5:30
दोघांपैकी एकाचा या मारहाणीत मृत्यू झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या तरुणावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बकरी चोरल्याच्या संशयावरून गावकऱ्यांकडून तरुणाची हत्या, झारखंडमधील धक्कादायक घटना
झारखंडमधील दुमका जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. दुमकातील काठीकुंड परिसरात झिलीमिली गावात बकरी चोरीच्या संशयाखाली जमावाने दोन तरुणांना बेदम मारल्याची घटना घडली आहे. त्या दोघांपैकी एकाचा या मारहाणीत मृत्यू झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या तरुणावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ही घटना घडली. शिकारीपाडामधील द्वारपहाडी गावात २६ वर्षीय सुभान मिया आणि ढाका गावातील २२ वर्षीय दुलाल मिर्धा १ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या काठीकुंडच्या झिलीमिली गावात गेले होते. मात्र, स्थानिक गावकऱ्यांनी त्यांच्यावर एकाची बकरी उचलून घेऊन गेल्याचा आरोप लावला.
गावाबाहेर हे दोन तरुण एका बकरीला कापत होते. तिथून जाणाऱ्या गावकऱ्यांनी ते पाहिले. त्यांनी त्या दोन तरुणांना घेरून बकरी चोर म्हणत त्यांच्यावर हल्ला केला. गोंधळ ऐकून लोकांनी गर्दी केली. या गर्दीने बकरी चोरीच्या संशयाने लावत त्या दोन तरुणांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसऱ्या एकाला गंभीर जखम झाली आहे. पोलीस अधिक्षक अंबर लकडा यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
धक्कादायक! लॉकडाऊनला कंटाळून इंजिनीयरची आत्महत्या
Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस