रावेतमध्ये एकाचा डोक्यात दगड घालून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 20:37 IST2019-03-26T20:36:07+5:302019-03-26T20:37:18+5:30
रावेत येथील धर्मराज चौकापासून जवळच असलेल्या लोहमार्गालगत मंगळवारी सकाळी एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

रावेतमध्ये एकाचा डोक्यात दगड घालून खून
पिंपरी : रावेत येथील धर्मराज चौकापासून जवळच असलेल्या लोहमार्गालगत मंगळवारी सकाळी एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीचा डोक्यात खून करण्यात आला असून मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.
देहूरोड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मराज चौकापासून ५० मीटर अंतरावर लोहमार्गालगत मंगळवारी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृताच्या डोक्यात दगड घातल्याने गंभीर इजा होवून त्याचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली असावी असा अंदाज आहे. ४२ ते ४५ वर्षीय या मृत व्यक्तीच्या दाढीचे व डोक्याचे केस वाढलेले असून हा व्यक्ती भंगार गोळा करणारा असावा, असे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे धस यांनी सांगितले. अधिक तपास सुरु असून घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत तपासाबाबत सूचना दिल्या आहेत.