बदनामी करतो या संशयातून उल्हासनगरात तरुणाचे डोके आपटून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 16:37 IST2021-11-29T16:36:50+5:302021-11-29T16:37:17+5:30
Murder Case : उल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन शनिदेव मंदिर परिसरात राहणाऱ्या किरण चारुदत्त म्हात्रे राहत असून परिसरातच फिरस्तीवर राहत असलेला राहुल हा त्याची बदनामी करतो

बदनामी करतो या संशयातून उल्हासनगरात तरुणाचे डोके आपटून खून
सदानंद नाईक
उल्हासनगर : मराठा सेक्शन परिसरात राहणाऱ्या किरण म्हात्रे याने रविवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्यान बदनामी करतो या संशयातून राहुल नावाच्या तरुणाचा जमिनीवर डोके आपटून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी विट्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली.
उल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन शनिदेव मंदिर परिसरात राहणाऱ्या किरण चारुदत्त म्हात्रे राहत असून परिसरातच फिरस्तीवर राहत असलेला राहुल हा त्याची बदनामी करतो. असा संशय किरणला आला होता. या संशयातून रविवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास राहुल भेटल्यावर बदनामी का करतो. असा प्रश्न किरण याने राहुल याला केल्यावर दोघात भांडण झाले. संशयातून व रागाच्या भरात किरण याने राहुलचे डोके जमिनीला आपटून व मटके डोक्यावर मारले. मारहाणीत राहुल याचा मृत्यू झाला असून विकास कानसे यांच्या तक्रारी वरून विट्ठलवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिसांनी किरण म्हात्रे याला अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.