कॅम्पमध्ये हातगाडी लावणाऱ्या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 23:48 IST2020-10-16T23:48:13+5:302020-10-16T23:48:48+5:30

उबेद कुरेशी हा बाबाजान दर्गा एज्युकेशन स्कुलच्या समोर कबाब पावची गाडी लावत असत..

Murder of a young man in the camp | कॅम्पमध्ये हातगाडी लावणाऱ्या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून

कॅम्पमध्ये हातगाडी लावणाऱ्या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून

पुणे : कॅम्पमधील बाबाजान दर्गा एज्युकेशन स्कुलजवळ कबाबपावची गाडी लावणाऱ्या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून करण्यात आला. 
उबेद बाबु कुरेशी (वय २८, रा. भीमपूरा, कॅम्प) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उबेद कुरेशी हा बाबाजान दर्गा एज्युकेशन स्कुलच्या समोर कबाब पावची गाडी लावतो. नबील शब्बीर बेलीम आणि उबेद हे दोघे एकमेकांचे परिचयाचे आहेत. उबेद हा नेहमी शिवीगाळ करीत असे. त्यामुळे नबील हा त्याच्यावर रागावला होता. नेहमीप्रमाणे उबेद याने आज नबील याला शिवीगाळ केली. त्यांच्यात चेष्टामस्करी सुरु असतानाच रागाच्या भरात नबील याने उबेद याच्या छातीमध्ये चाकू मारला. वर्मी घाव बसल्याने उबेद गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी नबील याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

Web Title: Murder of a young man in the camp