लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधांच्या रागातून पत्नीच्या प्रियकराचा खून; सांगवी येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 14:22 IST2020-09-14T14:21:29+5:302020-09-14T14:22:29+5:30

आरोपी आयाज याच्या पत्नीचे लग्नापूर्वी सौरभ जाधव याच्याशी प्रेमसंबंध होते.

Murder of wife's lover out of anger of premarital love affair; Incident at Sangvi | लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधांच्या रागातून पत्नीच्या प्रियकराचा खून; सांगवी येथील घटना 

लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधांच्या रागातून पत्नीच्या प्रियकराचा खून; सांगवी येथील घटना 

पिंपरी : पत्नीचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून तिच्या प्रियकरावर कोयत्याने वार केले. यात प्रियकराचा मृत्यू झाला. सांगवी येथे रविवारी (दि. १३) दुपारी साडेबारा ते दीडच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौरभ व्यंकट जाधव (वय २८, रा. संजय नगर, औंध) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर आयाज शेख (रा. शिवाजीनगर, पुणे) आणि सोन्या बाराथे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुशांत व्यंकट जाधव (वय २४, रा. संजयनगर, औंध) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयाज याच्या पत्नीचे लग्नापूर्वी सौरभ जाधव याच्याशी प्रेमसंबंध होते. याचा राग मनात धरून आरोपी आयाज आणि त्याचा साथीदार सोन्या बाराथे यांनी संगनमत करून सौरभ जाधव याच्यावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे ठार मारले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Murder of wife's lover out of anger of premarital love affair; Incident at Sangvi