ऐन दिवाळीत उल्हासनगरमध्ये तरुणाचा खून, गुंडांचा धुमाकूळ, घर, वाहनांची मोडतोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 01:26 IST2018-11-08T01:24:43+5:302018-11-08T01:26:39+5:30

ऐन दिवाळीत झालेल्या तरुणाच्या हत्येमुळे उल्हासनगर हादरले आहे.

Murder in Ulhasnagar | ऐन दिवाळीत उल्हासनगरमध्ये तरुणाचा खून, गुंडांचा धुमाकूळ, घर, वाहनांची मोडतोड

ऐन दिवाळीत उल्हासनगरमध्ये तरुणाचा खून, गुंडांचा धुमाकूळ, घर, वाहनांची मोडतोड

उल्हासनगर - ऐन दिवाळीत झालेल्या तरुणाच्या हत्येमुळे उल्हासनगर हादरले आहे. शिवसेना उपविभाग प्रमुख दशरथ चौधरी यांच्या पुतण्याचा खून लक्ष्मीपूजनच्या रात्री 11.30 वाजता सम्राट अशोकनगर चौकात झाला. या खुनानंतर गुंडांनी नंग्या तलवारी घेऊन परिसरात धुमाकूळ घालून वाहने आणि घरांची मोडतोड केली.

उल्हासनगर शहरात दिवाळी उत्साहात साजरी होत असतानाच शिवसेना उपविभाग प्रमुख दशरथ चौधरी यांच्या पुतण्याचा खून बुधवारी रात्री झाला. त्यानंतर काही तरुणांनी हातात तलवारी घेऊन परिसरात गोंधळ घातला. या तरुणांनी  नंगानाच करून घरे व मोटारसायकलीची तोडफोड केली. या प्रकाराने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर पोलीस तब्बल 1 एका तासाने घटनास्थळी पोहचल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

Web Title: Murder in Ulhasnagar