थरारक! पत्नीच्या हत्येप्रकरणी साक्ष देण्यासाठी आलेला पती, न्यायालयाच्या आवारात गोळ्या घालून केले ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 22:01 IST2022-04-22T20:04:21+5:302022-04-24T22:01:38+5:30

Firing Case : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला.

Murder sonipat court key witness wife murder case shot dead sonipat court complex | थरारक! पत्नीच्या हत्येप्रकरणी साक्ष देण्यासाठी आलेला पती, न्यायालयाच्या आवारात गोळ्या घालून केले ठार

थरारक! पत्नीच्या हत्येप्रकरणी साक्ष देण्यासाठी आलेला पती, न्यायालयाच्या आवारात गोळ्या घालून केले ठार

हरियाणातील सोनीपत जिल्हा न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा न्यायालयाच्या चेंबर क्रमांक 207 बाहेर वेदप्रकाश नावाच्या व्यक्तीची दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. हत्येची माहिती मिळताच सोनीपत पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला.

मुकीमपूर गावातील रहिवासी असलेल्या वेदप्रकाशने गेल्या वर्षी गावात राहणाऱ्या कनिका नावाच्या मुलीशी लग्न केले. तेव्हापासून वेदप्रकाश आणि कनिकाच्या कुटुंबात वाद सुरू होता. मुलीचे वडील विजय पाल यांनी आपल्या एका साथीदारासह आधी मुलगी कनिकाची हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह गंगा कालव्यात फेकल्याचा आरोप आहे.

वेदप्रकाश हा पत्नीच्या हत्येच्या खटल्यातील मुख्य साक्षीदार होता आणि तो न्यायालयात साक्ष देण्यासाठी आला असता, 207 क्रमांकाच्या चेंबरच्या बाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याआधीही सोनीपत न्यायालयात अनेकदा असे गुन्हे घडले आहेत.

या प्रकरणाची माहिती देताना शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वजीर सिंह यांनी सांगितले की, वेदप्रकाश नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. वेद प्रकाशने गेल्या वर्षी गावातील कनिकाशी लग्न केले होते आणि कनिकाची हत्या तिचे वडील विजयपाल यांनी केल्याचा आरोप आहे.वेदप्रकाश हा या खटल्यातील मुख्य साक्षीदार असून तो आज (शुक्रवारी) न्यायालयात साक्ष देण्यासाठी आला होता, त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडून त्याला ठार केले. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींच्या अटकेचे प्रयत्न सुरु केले आहेत.

Web Title: Murder sonipat court key witness wife murder case shot dead sonipat court complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.