माजी नगराध्यक्षा यांचे पती नामदेव शिनगारे यांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 20:49 IST2019-08-12T20:46:55+5:302019-08-12T20:49:06+5:30

पोलीस तपास करीत आहेत.

Murder of savita shingare's husband Namdeo Shingare in Dharur | माजी नगराध्यक्षा यांचे पती नामदेव शिनगारे यांची हत्या

माजी नगराध्यक्षा यांचे पती नामदेव शिनगारे यांची हत्या

ठळक मुद्देनगर पालिकेचे कर्मचारी नामदेव भिमराव शिनगारे (वय ५२) यांचा दगडाने ठेचून हत्यात्यांची दुचाकी गाडी घटनास्थळापासून अर्ध्या  किंमीवर पांदन रस्त्यावर उभी असल्याचे आढळले.

धारूर - धारूर शहराच्या माजी नगराध्यक्षा सविता शिनगारे  यांचे पती नगर पालिकेचे कर्मचारी नामदेव भिमराव शिनगारे (वय ५२) यांचा दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. ही घटना कशी घडली हे मात्र समजू शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत.

केज धारूर रस्त्या वर धारूर शहरापासून दिड किमी अंतरावर शेतात आंब्याच्या झाडाखाली चेहरा रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत नामदेव शिनगारे यांचे प्रेत पडलेले आढळून आले. त्यांची दुचाकी गाडी घटनास्थळापासून अर्ध्या  किंमीवर पांदन रस्त्यावर उभी असल्याचे आढळले. ही घटना दुपारनंतर घडल्याचा अंदाज असून या हत्येच्या घटनेने शहरात मात्र खळबळ माजली आहे. 

Web Title: Murder of savita shingare's husband Namdeo Shingare in Dharur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.