मित्राच्या डोक्यात कुऱ्हाड घालून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 05:57 IST2021-09-06T05:56:58+5:302021-09-06T05:57:42+5:30

सफाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून गेल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी सफाळे येथील जंगलात शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.

Murder by putting an ax on a friend's head pdc | मित्राच्या डोक्यात कुऱ्हाड घालून केला खून

मित्राच्या डोक्यात कुऱ्हाड घालून केला खून

ठळक मुद्देसफाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून गेल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी सफाळे येथील जंगलात शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर/सफाळे : सफाळे येथे दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणात अंकुश लहू वरठा या १९ वर्षीय आरोपीने आपला मित्र धीरज रामप्रसाद गौड (वय २४) याचा त्याच्या पत्नीसमोरच डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. फरार झालेल्या आरोपीला उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक आणि त्यांच्या टीमने डहाणू येथून अटक करण्यात यश मिळविले आहे.
सफाळे येथील सरूपाडा येथे राहणारे दोन मित्र बिगारी काम करीत असत. दारू प्यायल्यानंतर या दोन्ही मित्रांमध्ये नेहमी भांडणे होत असत. शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सफाळेमध्ये एका दुकानासमोर दोघांचे भांडण झाले. यावेळी आरोपी आपल्या हातात कोयता घेऊन आल्यानंतर उपस्थित काही लोकांनी त्यांचे भांडण मिटविले. नंतर मयत आपल्या घरी निघून गेला. काही वेळानंतर हातात कुऱ्हाड घेऊन आरोपी मयत धीरज याच्या घरी आला आणि झोपलेल्या धीरजच्या डोक्यात त्याच्या पत्नीच्या समोरच कुऱ्हाड घातली. रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडलेल्या आपल्या मित्राला पाहून भानावर आलेल्या आरोपीने पळ काढला. 

सफाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून गेल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी सफाळे येथील जंगलात शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. रविवारी पहाटे लोकल पकडून डहाणू येथील एका आदिवासीपाड्यात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळविले. 
मयत धीरज याला उपचारासाठी नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपीविरोधात सफाळे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सफाळे पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती सपोनि कहाळे यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Murder by putting an ax on a friend's head pdc