अज्ञात कारणावरून एका व्यक्तीची हत्या, कल्याण रेल्वे स्थानकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 19:52 IST2021-07-03T19:51:39+5:302021-07-03T19:52:09+5:30

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने संशयिताचा तपास 

Murder of a person for unknown reason incident at Kalyan railway station | अज्ञात कारणावरून एका व्यक्तीची हत्या, कल्याण रेल्वे स्थानकातील घटना

अज्ञात कारणावरून एका व्यक्तीची हत्या, कल्याण रेल्वे स्थानकातील घटना

ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने संशयिताचा तपास 

डोंबिवली: अज्ञात करणावरून एका इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना कल्याणरेल्वे स्थानकात फलाट क्रमांक १ वर शनिवारी सकाळी घडली. हत्या करणाऱ्या संशयित व्यक्तीचा कल्याण लोहमार्ग पोलीस शोध घेत आहेत. त्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आला असून त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू झाला असल्याची माहिती व्ही डी शार्दूल यांनी दिली. 

ही घटना सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकातील फलाट १अ या ठिकाणी घडल्याचे।पोलीस म्हणाले. प्राथमिक माहितीवरून ज्याची हत्या झाली तो स्थानक परिसरातील भंगार गोळा करणारा असू शकतो, त्याच्या वारसाचा देखील शोध लागला नसून तो सुरू आहे.

संशयितदेखील लोकलने प्रवास करून पुढे गेल्याचे दिसून येत आहे, त्या सगळ्या धागादोऱ्याने तपास सुरू असल्याचे ते म्हणाले. संध्याकाळी उशिरापर्यंत हत्येची घटना, नोंद करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Murder of a person for unknown reason incident at Kalyan railway station