Murder or Suicide! The body of a man was found in Masuda Lake of Thane | हत्या की आत्महत्या! ठाण्याच्या मासुदा तलावामध्ये पुरुषाचा सापडला मृतदेह  
हत्या की आत्महत्या! ठाण्याच्या मासुदा तलावामध्ये पुरुषाचा सापडला मृतदेह  

ठळक मुद्दे ५० ते ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११. ३० वाजण्याच्या सुमारास आढळला. नातेवाईकांचा शोध नौपाडा पोलिसांकडून घेण्यात येत आहे. नौपाडा पोलिसांनी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन केले.

ठाणे - येथील मासुंदा तलावामध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी दुपारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. प्रथमदर्शी ही आत्महत्या असल्याची शक्यता असून हा मृतदेह कोणाचा आहे, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

एचडीएफसी बँकेसमोरील भागात शेवाळी रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाचा बरमोडा (हाफ पॅन्ट) असलेल्या अवस्थेमध्ये या ५० ते ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११. ३० वाजण्याच्या सुमारास आढळला. ही माहिती मिळताच ठाणो अग्नीशमन दलाच्या जवानांनी हा मृतदेह बाहेर काढला. नौपाडा पोलिसांनीठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन केले. त्याच्या उजव्या आतावर इंग्रजीतील ‘आरकेजीएस जेएए’ अशी अद्याक्षरे आहेत. त्याची ओळखही पटलेली नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांचा शोध नौपाडा पोलिसांकडून घेण्यात येत आहे. प्राथमिक तपासात तरी ही आत्महत्या असल्याचे समोर आले असले तरी सर्व बाजूंनी याप्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक एस. पी. सोनवणे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.    

Web Title: Murder or Suicide! The body of a man was found in Masuda Lake of Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.